विविध उपक्रमांनी मुश्रीफ यांचा वाढदिवस उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विविध उपक्रमांनी मुश्रीफ यांचा वाढदिवस उत्साहात
विविध उपक्रमांनी मुश्रीफ यांचा वाढदिवस उत्साहात

विविध उपक्रमांनी मुश्रीफ यांचा वाढदिवस उत्साहात

sakal_logo
By

55300
-----------------------------------
विविध उपक्रमांनी मुश्रीफ
यांचा वाढदिवस उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : ‘गोकुळ’चे संचालक व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नविद मुश्रीफ यांचा वाढदिवस गडहिंग्लज शहर आणि गिजवणे-कडगाव जिल्हा परिषद मतदासंघातील राष्ट्रवादीतर्फे विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा केला. यानिमित्त उपजिल्हा रुग्णालय व साई मूकबधिर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ, फळ वाटप केले.
साई मूकबधिर विद्यालयातील कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी स्वागत केले. श्री. पाटील यांनी मुश्रीफ यांच्या कार्याचा आढावा घेतला. हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्यासह ‘लम्पी’ आजाराच्या सध्याच्या संकटकाळात ‘गोकुळ’च्या माध्यमातून पशुधनाच्या आरोग्यासाठी नविद मुश्रीफ यांनी घेतलेल्या पुढाकाराचे श्री. पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी कौतुक केले. एस. आर. पाटील, किरण कदम, वसंत यमगेकर, सिद्धार्थ बन्ने, बाळासाहेब देसाई, आनंदराव पाटील, रामगोंडा ऊर्फ गुंडू पाटील, अमर मांगले, महेश सलवादे, रश्मीराज देसाई, महेश गाडवी आदी उपस्थित होते.