राजे फौंडेशन पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजे फौंडेशन पुरस्कार
राजे फौंडेशन पुरस्कार

राजे फौंडेशन पुरस्कार

sakal_logo
By

फोटो क्रमांक : gad९१५.jpg
५५३४९
गडहिंग्लज : पुरस्कार वितरणप्रसंगी समरजित घाटगे व नवोदिता घाटगे.
----------------------------------------------------
शिक्षकांमुळेच ग्रामीण गुणवत्ता उजेडात
समरजित घाटगे ; स्व. विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

गडहिंग्लज, ता. ९ : ग्रामीण विद्यार्थ्यांची गुणवत्ता उजेडात आणण्यासाठी शिक्षकांचे कार्य अदृश्य शक्तीप्रमाणेच आहे. म्हणूनच अशा शिक्षकांचा स्व. विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव करण्याची संकल्पना राबविली, असे मत शाहू ग्रुपचे अध्यक्ष, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी आज येथे व्यक्त केले.
राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीतर्फे आयोजित स्व. विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. सूर्या सांस्कृतिक भवनात कार्यक्रम झाला. जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्ष नवोदिता घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. घाटगे म्हणाले, ‘सुविधा नसताना ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या शिखरावर पोचवण्यात शिक्षकांचेच योगदान अधिक आहे. त्यांना पुरस्कार देवून राजर्षी शाहू महाराजांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन केले. कोविड कामावेळी प्राण गमावलेल्या शिक्षकांना मदत मिळवून देण्यास कटिबद्ध आहे.’
कागल, उत्तूर व गडहिंग्लज भागातील प्राथमिक व माध्यमिकच्या ६७ शिक्षकांना मानपत्र, कोल्हापुरी फेटा व सन्मानचिन्ह देऊन गौरविले. पुरस्कारप्राप्त शिक्षकांत सेनापती कापशीचे ''सकाळ''चे बातमीदार प्रकाश कोकीतकर यांचाही समावेश आहे. यावेळी सुनील पाटील, बाळासाहेब पाटील, आर. एस. पाटील, नामदेव चौगुले, दिनकर खवरे यांचे भाषण झाले. राजेंद्र तारळे यांनी स्वागत तर रमेश कांबळे यांनी प्रास्ताविक केले. एल. डी. पाटील यांनी आभार मानले. अशोक चराटी, अमरसिंह घोरपडे, एम. पी. पाटील, अण्णासाहेब पाटील, प्रकाश चव्हाण, अनिता चौगुले, रवींद्र घोरपडे उपस्थित होते.

चौकट...
शाहूंचा आदर्श कागल घडवा
श्री. घाटगे म्हणाले, ‘स्व. विक्रमसिंह घाटगेंच्या स्वप्नातील राजर्षी शाहूंचे आदर्श कागल घडविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. मुलांप्रमाणे राजकारणातही गुणवत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावेत.