हलकर्णी पैगंबर जयंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हलकर्णी पैगंबर जयंती
हलकर्णी पैगंबर जयंती

हलकर्णी पैगंबर जयंती

sakal_logo
By

हलकर्णीत पैगंबर जयंती
नूल, ता. ९ : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे मुस्लिम धर्माचे प्रेषित महंमद पैगंबर यांची जयंती तथा ईद ए मिलाद साजरा करण्यात आला. मशिदीमध्ये मौलुदचा धार्मिक कार्यक्रम झाला. आज सकाळी आकर्षक फुले, फुग्यांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून मक्का मदीनाची प्रतिकृती ठेवून मशिदीपासून जुलूस काढण्यात आला. बँड, गायक, कव्वालीच्या निनादात बालचमुनी नारे तकबीर अल्लाहू अकबरच्या जयघोष केला. मुस्लिम तरुणांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. मशीदीजवळ जुलूसची सांगता झाली. समाजासाठी महाप्रसादाचे नियोजन केले होते. हाफिज महमंद मकानदार, हाफिज सद्दाम मालदार, सुन्नत जमातीचे अध्यक्ष अलीसाहेब कादरभाई, उपसरपंच सलीम यमकनमर्डी, नजीर बागवान, निजाम पानारी, हाजी लायकअली मालदार, मौला हावळ, फारुख हट्टी, आप्पासाहेब यमकनमर्डी, शब्बीर बागवान, समीअल्ला ताशिलदार, शानुल मकानदार, इरफान बागवान, ख्वाजा मालदार, नसरुद्दीन यमकनमर्डी, शानुल ढालाईत इस्माईल यमकनमर्डी, जमीर मालदार, राजू खलिफा, मुस्तफा सकली, इमान पानारी, अलाउद्दीन पानारी आदीसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.