कोवाड-पेरे-पाटील कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाड-पेरे-पाटील कार्यक्रम
कोवाड-पेरे-पाटील कार्यक्रम

कोवाड-पेरे-पाटील कार्यक्रम

sakal_logo
By

55404
फोटो ः सुरुते ः दीपप्रज्वलन करताना पाटोदा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भास्करराव पेरे-पाटील, सरपंच मारुती पाटील व इतर.
..........

गटतट बाजूला ठेवून
विकासाची मशाल हाती घ्या

भास्करराव पेरे-पाटील यांचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. ९ ः गावाच्या प्रगतीसाठी ग्रामस्थांची एकजूट महत्त्वाची असते. स्वच्छता हा गावचा आरसा आहे. गटा-तटांना बाजूला ठेवून गावच्या विकासाची मशाल हातात घ्या. गावचा सर्वांगीण विकास होण्यास कुणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन आदर्श पाटोदा गावचे माजी सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी केले.
सुरुते (ता. चंदगड) येथे सुरुते ग्रामपंचायत व विठ्ठलाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बसरेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘चला आदर्श गाव घडवू या’ विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना पेरे-पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच मारुती गंगाराम पाटील होते. दीपक बाचूळकर प्रमुख उपस्थित होते. ग्रामसेवक दीपक कांबळे यांनी स्वागत केले.
पेरे-पाटील म्हणाले, ग्रामविकासासाठी पंचसूत्री संकल्पना प्रभावी माध्यम असून, सरपंच व गावकऱ्यांनी एकमेकांना समजावून घेतल्यास गावचा विकास होण्याला कोणतीच अडचण येत नाही. शुद्ध पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि गावातील निराधार आणि वयस्कर नागरिकांचे पालनपोषण करण्याचा आरखडा तयार करावा. गावाच्या प्रगतीसाठी गावकऱ्यांनी स्वतः नियम तयार करावेत. लोकचळवळ चांगली उभे राहिली तर शासनही त्याची दखल घेते. ग्रामविकासाच्या प्रक्रियेत सुरळीत करभरणा केल्यास गावच्या विकास प्रक्रियेत सरकारी निधी आणि करातील पैसे असे दुप्पटीने अर्थसहाय्य प्राप्त होऊन गावचा कायापालट होईल.
यावेळी नरसिंग बाचूळकर, नारायण चोपडे, गुंडू कांबळे, मल्लापा पाटील, प्रभावती खणगावकर, शालन बोंगाळे, लता भाटे, यल्लूबाई नाईक, लक्ष्मी कांबळे उपस्थित होते.
----