ईद ए मिलादतर्फे प्रार्थना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ईद ए मिलादतर्फे प्रार्थना
ईद ए मिलादतर्फे प्रार्थना

ईद ए मिलादतर्फे प्रार्थना

sakal_logo
By

55428
कोल्हापूर : ईद ए मिलादुन्नबी कमिटीतर्फे जुलूस, शांतता मिरवणुकीत सहभागी मान्यवर.

ईद-ए-मिलादनिमित्त
शांतता मिरवणूक
कोल्हापूर, ता. ९ : ईद-ए-मिलादनिमित्त ईद ए मिलादुन्नबी कमिटीतर्फे जुलूस आणि शांतता मिरवणूक काढली. मिरवणुकीची सुरुवात ईदगाह मैदान येथे झाली. राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्री. नाळे, मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. नंगीवली दर्गा, घुडणपीर दर्गा, बाबू जमाल दर्गा असा मिरवणुकीचा मार्ग होता. या दरम्यान, विविध मंडळांतर्फे अनेक ठिकाणी स्टॉल्सद्वारे फळे, दूध, शिरा, पाण्याचे वाटप केले.
हाजी फिरोज गुलमोहम्मद सतारमेकर, साजिद मकानदार, मुबारक काझी, अल्ताफ काझी, मुल्ला इम्तियाज खान, शकील मुजावर, इम्तियाज पठाण, इरफान शेख, आसिफ सदलगे, अल्फाज कछी, रियाझ खान, मुस्तफा नुराणी, बालम झारी, लियाकत मुजावर, जहॉँगीर अत्तार, इद्रिस कच्ची, बशीर मुजावर, वसीम मुल्ला, मन्सूर अत्तार, हर्षद कच्ची, खोदुस जिलानी, जमीर मणेर आदी उपस्थित होते. हाजी नासीर जिलानी, हाजी रशीद काझी यांनी स्वागत केले. फायाझ शिकलगार यांनी आभार मानले.