इचल : महापालिका आवश्यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : महापालिका आवश्यक
इचल : महापालिका आवश्यक

इचल : महापालिका आवश्यक

sakal_logo
By

दांडीबहाद्दर सफाई कर्मचाऱ्यांना आता दंड
इचलकरंजीत प्रशासकांचा बडगा; परस्पर आठवडाभर अनुपस्थित राहणे पडणार महागात

इचलकरंजी, ता. ९ ः शहरातील स्वच्छता कामात हलगर्जीपणा होत आहे. प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या पाहणीमध्ये ही गंभीर बाब समोर आली. यानंतर त्यांनी परस्पर सात दिवस अनुपस्थित राहणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश त्यांनी प्रभारी आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. याबाबत अहवाल सादर करण्यास विलंब केल्यास मुकादम, प्रभारी निरीक्षक व स्वच्छता निरीक्षकांवरही दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
शहरात घंटागाडीच्या माध्यमातून घरोघरी कचरा संकलीत होत आहे. त्यावर झालेला वारेमाप खर्चही दुर्लक्षित करुन चालणार नाही. दुसरीकडे सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत मात्र हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाही प्रभावीपणे काम करीत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत प्रशासक देशमुख यांनी स्वतः पाहणी केल्यानंतर गंभीर बाबी समोर आल्या. त्यांनी थेट प्रभारी आरोग्य अधिकाऱ्यांना आदेश पारित केला आहे. यामध्ये जे सफाई कर्मचारी किंवा क्षेत्रीय कर्मचारी यांनी पूर्वसूचना न देता व रजा अर्ज मंजूर करुन न घेता सलग सात दिवस कामांवर अनुपस्थित राहणे भोवणार आहे. या कर्मचाऱ्यांना या कालावधीतील वेतनावर पाणी सोडावे लागेल. पगारी रजा मंजुरीसाठी शिफारसही करता येणार नाही.
अनुपस्थीत कर्मचाऱ्यास रोज १०० रु. दंड होईल. त्याची जबाबदारी प्रभारी आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपविली आहे. कारवाईची नोंद सेवा पुस्तकात करण्यासाठीचा अहवाल आस्थापना विभागाकडे द्यावा लागेल. अहवाल सादर न केल्यास संबंधित मुकादम, प्रभाग निरीक्षक व स्वच्छता निरीक्षकांवरही रोज १०० रु. दंड आकारणी होईल. त्याची नोंदही सेवा पुस्तकात होईल. याचे नियोजन करुन कार्यवाहीचा अहवाल पाठविण्याचे आदेश प्रशासक देशमुख यांनी प्रभारी आऱोग्य अधिकाऱ्यांना दिले.
-----------
चौकट
शिस्त लागण्याची आशा
यापूर्वीही कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी प्रशासक देशमुखांनी भरारी पथक नियुक्त केले आहे. कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत गैरहजर कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. आता सफाई कर्मचा-यांनाही शिस्त लावण्यासाठी निर्णय घेतला. एकूणच महापालिकेच्या कर्मचा-यांना शिस्त लागेल, अशी आशा आहे.