अंबाबाई महाप्रसाद बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबाबाई महाप्रसाद बातमी
अंबाबाई महाप्रसाद बातमी

अंबाबाई महाप्रसाद बातमी

sakal_logo
By

.
55434

अश्विन पौर्णिमेनिमित्त
अंबाबाई मंदिरात महाप्रसाद

कोल्हापूर, ता. ९ ः करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि श्री महालक्ष्मी भक्त मंडळ यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन केले होते. दुपारी ४ पर्यंत ३० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची नुकतीच सांगता झाली. या निमित्ताने मंदिरात अश्विन पौर्णिमेच्या औचित्याने महाप्रसादाचे आयोजन केले होते. आज देवीची अन्नपूर्णा रुपात पूजा बांधली होती. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि श्री महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे आयोजित महाप्रसादासाठी घाटी दरवाजा चौक ते शनिमहाराज यांच्या मंदिराचा परिसरात मंडप घातला होता. पूर्व दरवाजातून दर्शन आणि महाप्रसाद घेण्यासाठी जाणाऱ्यांकरिता स्वतंत्र रांग सुरू ठेवण्यात आली. शिर्डी स्टीलचे मॅनेजिंग डायरेक्टर अलोक बन्सल यांच्या हस्ते, तर देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेअकरा वाजता महाप्रसाद वाटप सुरू झाले. सर्वप्रथम मूकबधिर विद्यार्थ्यांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी उद्योगपती शिवाजी मोहिते, भरत ओसवाल, अभिजीत चव्हाण, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे आदी उपस्थित होते. श्री महालक्ष्मी भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी स्वागत केले. नंदकुमार मराठे यांनी सूत्रसंचालन केले. एस. के. कुलकर्णी यांनी आभार मानले. महाप्रसादाचा दुपारी साडेचार वाजेपर्यंत ३० हजार भाविकांनी लाभ घेतला.