मुस्लिम ऑर्गनायझेशनतर्फे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुस्लिम ऑर्गनायझेशनतर्फे सत्कार
मुस्लिम ऑर्गनायझेशनतर्फे सत्कार

मुस्लिम ऑर्गनायझेशनतर्फे सत्कार

sakal_logo
By

55450
कोल्हापूर : ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी उपस्थित मान्यवर.

प्रबोधनाची चळवळ सुरू ठेवा
शब्बीर अन्सारी; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : ‘‘मुस्लिम समाजामध्ये पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या ओबीसींना आरक्षण मिळाले, मात्र ही लढाई थांबलेली नाही. समाजातील शेवटच्या दुर्बल घटकाला आरक्षणाचा लाभ मिळेपर्यंत प्रबोधनाची चळवळ पुढे सुरू ठेवण्याची जबाबदारी समाजातील स्वयंसेवी संस्था आणि प्रतिनिधींची आहे,’’ असे उद्‌गार ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी काढले.
अन्सारी यांनी मुस्लिम समाजातील मागासवर्गीय दुर्बल घटकांना ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले. आरक्षण मिळवून दिले. मुंबईच्या मुद्रा या संस्थेने राज्यातील १०१ प्रभावशाली व्यक्तींची यादी नुकतीच प्रसिध्द केली. श्री. अन्सारी यांचा समावेश आहे. त्याबद्दल आज त्यांचा शाहू स्मारक भवनमध्ये सत्कार झाला. या वेळी ते बोलत होते.
आमदार जयश्री जाधव, संघटनेचे जिल्हाध्यक्ष रफिक शेख, मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर, शहराध्यक्ष बापू मुल्ला यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मानपत्र, गौरवचिन्ह देऊन श्री. अन्सारी यांना सन्मानित केले. प्रा. तोहीद मुजावर यांनी दहावी-बारावीनंतरच्या करिअरची माहिती दिली.
आमदार जयश्री जाधव, अन्सारी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित दहावी आणि बारावीच्या २०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला; तर वैद्यकीय व्यवसायातील उल्लेखनीय सेवेबाबत डॉ. वसीम मुल्ला यांचा विशेष सन्मान केला.
माजी महापौर निलोफर आजरेकर, एसबीआय बँकेच्या व्यवस्थापिका लुबना पठाण, हाजी बाबासाहेब शेख, डॉ. नसिमा मुल्ला, जहॉँगिर अत्तार, मोहसिन खान, तन्वीर बेपारी, रफिक शेख, सिकंदर मुजावर, बापू मुल्ला, अन्वर मुल्ला, जुबेर काझी, आतिक समडोळे, मुसा खलिफा, बाळासाहेब मोमीन यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.