मुश्रीफ कार्यक़्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुश्रीफ कार्यक़्रम
मुश्रीफ कार्यक़्रम

मुश्रीफ कार्यक़्रम

sakal_logo
By

फोटो क्रमांक 55451
गडहिंग्लज : स्थानिक विकास निधीतून पालिकेला पाच घंटागाड्या हसन मुश्रीफ यांच्याकडून स्वीकारताना नगर अभियंता सुधीर पोतदार. शेजारी किरण कदम, वसंत यमगेकर, सिद्धार्थ बन्ने, गुंडू पाटील आदी.
-------------------------------------------------------------------------
गडहिंग्लजला देशात अग्रेसर बनवू
हसन मुश्रीफ : गडहिंग्लजला सव्वा कोटींच्या कामांना प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : गडहिंग्लज शहरासाठी आतापर्यंत ४३ कोटींचा विकास निधी दिला आहे. भविष्यात बेघर वसाहत नियमितीकरण, रिंगरोड, सुधारित नळ पाणी योजना, क्रीडा संकुल ही कामे पूर्णत्वाला नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. गडहिंग्लजला देशात प्रथम क्रमांकाचे शहर बनविण्याचे माझे स्वप्न असून, त्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
येथील १ कोटी ३० लाखांच्या विविध विकासकामांच्या उद्‌घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, ‘दिवाळीनंतर पालिकांच्या निवडणुका लागतील. तत्पूर्वी शहरातील महत्त्वाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आढावा बैठक घेऊ. प्राधान्यक्रमाच्या कामांसाठी तत्काळ ५० लाखांचा निधी उपलब्ध करण्याचा माझा प्रयत्न राहील. आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढविण्याची तयारी सुरू आहे. झोपडपट्टीवासीयांना कागलच्या धर्तीवर हक्काच्या घरांचे प्रॉपर्टी कार्ड मिळवून देऊ. नियोजन मंडळातून रिंगरोडसाठी निधी देऊन वाहतुकीच्या कोंडीतून शहरवासीयांना मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. बालेवाडीनंतरचे क्रीडा संकुल शहरात उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी एक कोटीचा निधीही दिला आहे. भविष्यात हा प्रकल्प निश्‍चित मार्गी लावू. शहरातील महत्त्वाची सर्व कामे राष्ट्रवादीमुळे मार्गी लागली असून, शहर विकासासाठी आवश्यक ते सर्व करण्याचे नियोजन आहे.
यावेळी किरण कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे निवडणूक आयोगाने मराठी माणसाची अस्मिता असलेल्या शिवसेनेचे नाव व चिन्ह दोन्ही गोठविल्याने मराठी जनमानसात अस्वस्थतता पसरल्याचे सांगितले. बसवराज आजरी, पूनम म्हेत्री यांचे यावेळी भाषण झाले. सुनील शिंत्रे व नागेश चौगुलेंनी रिंगरोडची भूमिका मांडली. रामगोंड ऊर्फ गुंडू पाटील यांनी स्वागत तर सिद्धार्थ बन्ने यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास शहरातील प्रमुख कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.
.......
चौकट...
‘गोडसाखर’साठी जीवाची बाजी लावू

मुश्रीफ म्हणाले, ‘आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा करण्याची हिंमत केवळ राष्ट्रवादीतच आहे. हा अडचणीतील गोडसाखर कारखाना सुरळीत चालू करून तालुक्याचे वैभव टिकवण्यासह आजी-माजी कामगार व शेतकऱ्यां‍चे प्रश्‍न मिटावेत यासाठी मी जीवाची बाजी लावेन.’