अंधांना मिळणार सफेद काठ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंधांना मिळणार सफेद काठ्या
अंधांना मिळणार सफेद काठ्या

अंधांना मिळणार सफेद काठ्या

sakal_logo
By

लोगो - सकाळ बातमीचा परिणाम

अंधांना मिळणार
सफेद काठ्या
मदतीसाठी डॉक्टर, उद्योजक, व्यापारी धावले
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : दृष्टीहिनांसाठी लाल-पांढरी (सफेद) काठी देण्याच्या आवाहनाला डॉक्टर, उद्योजक, व्यापाऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे पाहता पाहता शंभर-दीडशे अंधांना सफेद काठ्या आता मिळणार आहेत. याबाबत ‘सकाळ’मध्ये ‘दृष्टीहिनांसाठी हवी लाल-पांढरी काठी’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
राष्ट्रीय दृष्टीहीन संघाकडून प्रत्येक दृष्टीहिनांसाठी सफेद काठी देण्याचे आवाहन केले होते. अनेकांकडे काठी नसल्यामुळे त्यांना अपघाताला सामोरे जावे लागत होते. या पार्श्‍वभूमीवर अंध दिनानिमित्त दृष्टीहिनांना सफेद काठी देण्यात येणार होती मात्र त्यासाठी आर्थिक हातभार आवश्‍यक होता. हाच धागा पकडून ‘सकाळ’ने बातमी प्रसिद्ध झाल्यावर हेमॅटॉलॉजीस्ट डॉ. विजय हिराणी, उद्योजक जयेश ओसवाल, आशिष घेवडे, श्रीनिवास मिठारी, पारस ओसवाल यांच्याकडून मदत झाली आहे. या सर्वांच्या सहकाऱ्यांतून आता सुमारे दीडशेहून अधिक सफेद काठी मिळणार असल्याचे राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे महासचिव शरद पाटील यांनी सांगितले.
----------
चौकट
शनिवारी कार्यक्रम
प्रत्येक वर्षी १५ ऑक्टोबरला अंध दिनाचे कार्यक्रम होतात. मात्र दृष्टीहितांच्या सोयीसाठी रविवारी (ता. १६) सकाळी दहावाजता राष्ट्रीय दृष्टीहीन संघातर्फे दसरा चौकातून सफेद काठीसह रॅली काढली जाणार आहे. तेथून ती रॅली शिवाजी मार्केटमध्ये येईल. तेथे छोटा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात सहाकार्य केलेल्यांचे आभार मानले जाणार असल्याचे महासचिव पाटील यांनी सांगितले.