राज्यस्तरीय युवा कवी संमेलन आज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यस्तरीय युवा कवी संमेलन आज
राज्यस्तरीय युवा कवी संमेलन आज

राज्यस्तरीय युवा कवी संमेलन आज

sakal_logo
By

राज्यस्तरीय युवा
कवी संमेलन आज रंगणार
कोल्हापूर : येथील काव्यांगण संस्था, लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार आणि मुक्तबंध विचारमंच (कागल) यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (गुरुवारी) शाहू स्मारक भवनात सायंकाळी पाचला निमंत्रितांचे राज्यस्तरीय युवा कवी संमेलन होणार आहे.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त राजर्षी शाहूंना हे संमेलन समर्पित केले आहे. संमेलनासाठी कवी अनंत राऊत (अकोला), कवी डॉ. स्वप्नील चौधरी (सोयगाव), रोहित शिंगे (इचलकरंजी), विश्वास पाटील (राधानगरी), रोहिणी कदम (मुंबई), सारंग पांपटवार (नांदेड), अजय त्रिभुवन (औरंगाबाद), शेखर चोरगे (पुणे) आदींची उपस्थिती असेल. कोल्हापूर जिल्हा परिसरातील कवींसह रसिकांनी संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.