विश्वास पाटील मैत्रेय सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विश्वास पाटील मैत्रेय सत्कार
विश्वास पाटील मैत्रेय सत्कार

विश्वास पाटील मैत्रेय सत्कार

sakal_logo
By

55919

समाजासमोर इतिहासामागील
भूगोल आणण्यासाठी उपक्रम
मैत्रेय प्रतिष्ठानतर्फे कादंबरीकार विश्वास पाटील यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या जाज्वल्य इतिहासाबरोबरच या इतिहासामागील भूगोलही आता समाजासमोर येणे आवश्यक आहे. त्यासाठी येत्या काळात विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प आज झाला. प्रसिद्ध कादंबरीकार विश्‍वास पाटील यांनी छत्रपती शिवरायांवरील ‘महासम्राट’ कादंबरी मालिकेतील ‘झंझावात’ हा पहिला खंड प्रतिष्ठानकडे सुपूर्द केला. यानिमित्ताने झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात इतिहासविषयक विविध विषयांवर सर्वांगीण चर्चा झाली. दरम्यान, मैत्रेय प्रतिष्ठानतर्फे पाटील यांचा या वेळी सत्कार झाला.
छत्रपती शिवाजी महाराज साऱ्यांचीच अस्मिता असले तरी शिवकाळातील अनेक अपरिचित व्यक्ती, प्रसंग अजूनही समाजासमोर आलेले नाहीत. त्यासाठी लेखनाबरोबरच विविध उपक्रमातून या गोष्टी समाजासमोर मांडल्या गेल्या पाहिजेत, असा सूर या कार्यक्रमातून उमटला. या वेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ भोसले, उदय कुलकर्णी, दशरथ गोडसे, विक्रम पाटील, आदिती अडके, रत्नाकर जाधव आदी उपस्थित होते.