अभ्यासाची युद्धनिती आखल्यास यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभ्यासाची युद्धनिती आखल्यास यश
अभ्यासाची युद्धनिती आखल्यास यश

अभ्यासाची युद्धनिती आखल्यास यश

sakal_logo
By

ich121.jpg
55922
इचलकरंजी ः किशोर करिअर पॅाईंट ॲकॅडमीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी डॉ. अनिल मडके, विशाल पागडे, ज्योती पागडे, डॉ. पूजा रुईकर, डी. जी. पिट्टा आदी.
----------
अभ्यासाची युद्धनिती आखल्यास यश
डॉ. अनिल मडके; किशोर करिअर पॉईंटतर्फे गुणवंतांचा सत्कार
इचलकरंजी, ता. १२ ः परीक्षा म्हणजे एक प्रकारचे युद्धच असते. त्यासाठी अभ्यासाची युद्धनिती आखावी लागते. तरच यशाचे शिखर गाठता येते, असे प्रतिपादन हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिल मडके (सांगली) यांनी केले. येथील किशोर करिअर पॅाईंट ॲकॅडमीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. जेईई, नीट, आयसर, सीईटी या परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या १००, तर ऑलिम्पियाडच्या एका विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. नीट परीक्षेत भौतिकशास्त्र विषयात देशात पहिला आलेला सौद नस्सार याच्यासह या विभागाच्या प्राध्यापकांचा विशेष सत्कार झाला.
ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष विशाल पागडे यांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला. हे यश माझे एकट्याचे नसून सर्व माझ्या टीमचे आहे. आमची स्पर्धा आमच्याशीच असून पुढील वर्षाच्या निकालामध्ये आमच्या संस्थेचे विद्यार्थी उत्तुंग भरारी मारतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संचालिका ज्योती पागडे, अब्दुल नस्सार, शिवलिंग स्वामी या पालकांनी व सिद्धी हुंबे, रिया सूर्यवंशी, श्रीनाथ हेगाण्णा या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डी. जी. पिट्टा यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. पूजा रुईकर यांनी करून दिली. श्रीकांत कांबळे व आगरे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन जाधव यांनी आभार मानले.