हनिमनाळच्या दोन बैलांना लम्पीची झाली लागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हनिमनाळच्या दोन बैलांना लम्पीची झाली लागण
हनिमनाळच्या दोन बैलांना लम्पीची झाली लागण

हनिमनाळच्या दोन बैलांना लम्पीची झाली लागण

sakal_logo
By

हनिमनाळच्या दोन बैलांना
लम्पीची झाली लागण
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : अखेर गडहिंग्लज तालुक्यात लम्पीचा शिरकाव झाला आहे. हनिमनाळ (ता. गडहिंग्लज) येथील दोन बैलांना याची लागण झाली आहे. पशुसंवर्धन विभागाकडून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. अन्य जनावरांना संसर्ग टाळण्यासाठी बाधित बैलांची शेतामध्ये स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
येथील जनावरांचा आठवडा बाजार बंद करण्यासह विविध उपाययोजनांमुळे गडहिंग्लज तालुक्यात एकाही जनावराला लम्पीचा संसर्ग झाला नव्हता. दरम्यान, हनिमनाळ येथील दोन बैलांना लम्पीसदृश आजाराची लक्षणे दिसून आली. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांना लम्पीचीच लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या बैलांवर तातडीने उपचार सुरू केले आहेत. एका बैलाला तीव्र स्वरूपाची लक्षणे आहेत. दुसऱ्या बैलाच्या लक्षणाचे स्वरूप कमी आहे.
गावात जनावरांचे लसीकरण घेण्यात आले होते. त्या दिवशी या बैलांना शेतीकामासाठी नेले होते. त्यामुळे लसीकरण झाले नव्हते. बैलमालकांनीही त्यानंतर लसीकरणाकडे दुर्लक्ष केले होते. अन्य जनावरांना लागण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून लम्पी बाधित बैलांची शेतातच व्यवस्था केली असल्याचे सांगण्यात आले. बैल मालकाची घरी अन्य तीन गायी आहेत; पण त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांचे लसीकरण झाले होते.