अर्बन बँक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्बन बँक
अर्बन बँक

अर्बन बँक

sakal_logo
By

शेवटच्या दिवशी ३२ उमेदवारी अर्ज

अर्बन बँक निवडणूक ः आज छाननी, २८ ऑक्टोबरपर्यंत माघार
....................
कोल्हापूर, ता. १२ ः येथील कोल्हापूर अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी ३२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यात सर्वाधिक २० अर्ज हे सर्वसाधारण गटातील आहेत. भटक्या विमुक्त गटातून आज एकही अर्ज दाखल झाला नाही. बँकेच्या निवडणुकीसाठी १३ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे.
दरम्यान, दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी उद्या (ता. १३) होणार आहे. छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. १४ ते २८ ऑक्टोबर अशी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
यावेळी विद्यमान संचालक उदय निगडे यांनीच सत्तारूढ गटाविरोधात बंड पुकारल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. सत्तारूढ गटातील आणखी एक-दोन संचालक विरोधकांना मिळण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातील सर्वात जुनी आणि शंभरी पार केलेल्या या बँकेची निवडणूक पहिल्यांदाच चुरशीची होण्याची शक्यता आहे. संचालक पदाच्या १५ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. बँकेचे सुमारे २६ हजार सभासद मतदानासाठी पात्र आहेत.
आज अर्ज दाखल केलेल्या प्रमुखांत आदित्य रणजित जाधव, गीता रणजित जाधव, गीता हसूरकर, संचालक जयसिंग माने, त्यांच्या पत्नी सौ. स्मिता, रशिद बारगीर, अश्‍विनी तावरे आदींचा समावेश आहे.
.................

आज दाखल झालेले अर्ज (कंसात आजपर्यंतचे अर्ज)

सर्वसाधारण गट - २० (७८), महिला प्रतिनिधी - ५ (१२), इतर मागासवर्गीय प्रतिनिधी - ४ (११), अनुसूचित जाती-जमाती- ३ (७), भटक्या विमुक्त-० (४).
.............