जलसंपदा शेतकऱ्यांसाठी विशेष मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलसंपदा शेतकऱ्यांसाठी विशेष मोहीम
जलसंपदा शेतकऱ्यांसाठी विशेष मोहीम

जलसंपदा शेतकऱ्यांसाठी विशेष मोहीम

sakal_logo
By

दुधगंगा प्रकल्पातून विद्युत उपसायंत्र
परवान्यासाठी विशेष मोghम

कोल्हापूर, ता. १२ : दुधगंगा प्रकल्पावर विद्युत उपसा यंत्र परवाना देण्यासाठी जिल्ह्यासाठी विशेष मोहीम आयोजिली आहे. ‘प्रथम येईल त्यांना प्रथम’ या तत्त्वानुसार दुधगंगा खोऱ्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटबंधारे विभाग (उत्तरचे) कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केले आहे.

प्रकल्पावरील नदी पातळीपासून दोन्ही तीरावरील लाभक्षेत्र सिमीत उंचीपर्यंतचे मर्यादित क्षेत्र ओलीताखाली येणे अपेक्षित आहे. प्रकल्पाद्वारे सिंचनाखाली येणाऱ्या सर्व वैयक्त‍िक लाभधारक, सहकारी पाणीपुरवठा संस्थांना लाभक्षेत्रातील दुधगंगानगर, सरवडे, कागल या गावांमधील शेतकरी, बागायतदार यांना सिंचनाचे परवाने देण्यासाठी मोहिमेचे आयोजन आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने केले आहे. मोहिमेची सुरुवात मौजे सरवडे (ता. राधानगरी) येथून होत आहे. परवान्यासाठी अर्जदारांचा विनंती अर्ज, सात-बारा आणि आठ-अचे उताऱ्याच्या आधारावर परवाने देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.
-------