डिओटी विद्यार्थ्याचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिओटी विद्यार्थ्याचे यश
डिओटी विद्यार्थ्याचे यश

डिओटी विद्यार्थ्याचे यश

sakal_logo
By

56069

दिनेश गावडे यांना
रिसर्च एक्सलन्स ॲवॉर्ड

कोल्हापूर, ता. २५ ः शिवाजी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमधील इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन या शाखेचे माजी विद्यार्थी दिनेश गावडे यांच्या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली आहे. त्यांना आयर्लंड येथील टिंडल नॅशनल इन्स्टिट्यूट या युरोपमधील अग्रगण्य संशोधन संस्थेत उत्कृष्ट संशोधनासाठीचा रिसर्च एक्सलन्स पुरस्कार प्राप्त झाला.
गावडे हे सामान्य कुटुंबातील, ग्रामीण पार्श्वभूमीचे विद्यार्थी. डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीतून बी. टेक. पदवी मिळविली. बी. टेक. नंतर टिंडल नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च असिस्टंट म्हणून रुजू झाले. त्यानंतर एम. एस. (बाय रिसर्च) या पदव्युत्तर पदवीसाठी त्यांची निवड झाली. भारतीय रुपयात सुमारे २० लाख स्टायपेंड व फी माफी या सुविधा त्यांना युरोपियन युनियनमार्फत मिळाल्या. एम. एस. नंतर त्यांना पीएच. डी. साठी प्रवेश मिळाला. यावेळीही फी माफी व सुमारे २० लाख रुपये स्टायपेंड मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टीमस ‘एम. सी. सी. आय.’ या रिसर्च सेंटरतर्फे मिळाली. पुरस्कार प्राप्त झाल्याची माहिती गावडे यांनी दूरध्वनीवरून दिली. शिवाजी विद्यापीठ व डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांना इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन शाखा समन्वयक डॉ. एस. बी. चव्हाण, इंटरनॅशनल अफेअर्स सेल डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे समन्वयक प्रा. उदय आनंदराव पाटील व स्टाफचे मार्गदर्शन लाभले. डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. एस. एन. सपली यांनी त्यांचे अभिनंदन केले.