विद्यापीठात मानसिक आरोग्य दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठात मानसिक आरोग्य दिन
विद्यापीठात मानसिक आरोग्य दिन

विद्यापीठात मानसिक आरोग्य दिन

sakal_logo
By

मानसिक आरोग्य दिन
विद्यापीठात उत्साहात
कोल्हापूर, ता. १२ : शिवाजी विद्यापीठातील मानसशास्त्र अधिविभागात जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा झाला. या निमित्त अधिविभागातील विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शन केले. त्याचे उद्‍घाटन गांधी अभ्यास केंद्र व कै. श्रीमती शारदाबाई पवार अध्यासन केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी केले.
डॉ. पाटील म्हणाल्या, ‘‘समाजाचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करायला हवेत आणि मानसशास्त्र विभाग यामध्ये निश्चितच पुढाकार घेईल.’’ अधिविभागात डॉ. प्रदीप पाटील (आकार फाउंडेशन, सांगली) यांचे ‘बदलत्या काळातील स्त्रियांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, ‘‘आदिम काळापासून स्त्री आणि पुरुष तीन वेगवेगळ्या स्तरांमध्ये विभागला गेला होता. स्त्रियांना जर मानसिक निरोगी व्हायचे असेल, तर विवेकी दृष्टिकोनातून विचार होणे गरजेचे आहे. स्त्रियांनी खंबीरपणे उभे राहण्यासाठी खंबीरतेचे कौशल्य अवगत करणे गरजेचे आहे.’’ या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी अधिविभागाचे विभागप्रमुख डॉ. सुभाष कोंबडे होते. डॉ. अश्विनी पाटील यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. प्रा. मिलिंद सावंत उपस्थित होते. वैष्णवी माने हिने सूत्रसंचालन केले. ज्योती निकाळजे हिने आभार मानले.