थकबाकी वसुलीसाठी महावितरणचे पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थकबाकी वसुलीसाठी महावितरणचे पत्र
थकबाकी वसुलीसाठी महावितरणचे पत्र

थकबाकी वसुलीसाठी महावितरणचे पत्र

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...
............
थकबाकी वसुलीसाठी महावितरणचे पत्र

सात योजनांची ७ कोटी थकबाकी
सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर, ता. १३ : ग्रामीण भागातील पाणी योजनांसाठी वापरलेल्या विजेचे बिल मिळावे, यासाठी महावितरणकडून जिल्‍हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यां‍ना पत्र देण्यात आले आहे. सात गावांची ७ कोटी २२ लाख १२ हजार २५ रुपये इतकी थकबाकी आहे. ही थकबाकी लवकरात लवकर भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता यांनी केले आहे.

हातकणंगले येथील रुई ग्रामपंचायतीच्या योजनेची थकबाकी १ कोटी ४९ लाख ८१ हजार ८२० रुपये इतकी आहे. कोरोची (१६ लाख, ३३ हजार ५८०), कबनूर (१ कोटी ९ लाख १० हजार ५४०) व ग्राम आरोग्य पोषण पाणी समिती (१ कोटी ५५ लाख ६२ हजार ६९०), वारणा कोडोली (२ कोटी ४६ लाख १ हजार ५४०), हातकणंगले (२९ लाख ८३ हजार २५०), शिये पाणी योजनेची १५ लाख ३८ हजार ६०५ रुपये इतकी थकबाकी आहे. वरील पाणी योजनांना उच्‍चदाब वीज जोडणी देण्यात आली आहे. मात्र या योजनांची थकबाकी मोठी असल्याने त्यासाठी विभागाकडून पाठपुरावा सुरु आहे. थकबाकी भरण्यासाठी ग्रामपंचायती सकारात्‍मक सहकार्य करत नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे. तर या पत्राच्या आधारे ग्रामपंचायत विभागाने संबंधित ग्रामपंचायतींना थकबाकी भरण्यासाठी सूचना केल्या आहेत.