सेवानिवृत्त कर्मचारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवानिवृत्त कर्मचारी
सेवानिवृत्त कर्मचारी

सेवानिवृत्त कर्मचारी

sakal_logo
By

महानगरपालिका निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवेदन
कोल्हापूर, ता. १२ ः सहाव्या वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम आदा करण्याबरोबरच महागाई भत्‍याच्या फरकाची रक्कमही दिवाळीपूर्वी आदा करण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर महानगरपालिका निवृत्त कर्मचारी कल्याणकारी व सांस्कृतिक संघाने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली.
निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्र शासन निर्णय व महापालिकेच्या सभा ठरावानुसार सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन फरकांची रक्कम देण्याबाबत वारंवार मागणी करूनही अद्याप आदा केलेली नाही. चार वर्षे होऊन गेली आहेत. यंदा दिवाळीपूर्वी जुलै ते सप्टेंबर २०२१ अखेर ११ टक्के प्रमाणे महागाई भत्त्याचा तीन टक्के फरक, जुलै २०२१ ते मार्च २०२२ अखेर तीन टक्के प्रमाणे महागाई भत्त्याचा नऊ महिन्याचा फरक व जानेवारी ते सप्टेंबर २२ अखेर तीन टक्के प्रमाणे आठ महिन्यांचा महागाईचा फरक देण्यात यावा. त्याचप्रमाणे सातव्या वेतन आयोगाचा एक वर्षाचा पेन्शन फरक अद्याप द्यायचा आहे. अध्यक्ष श्रीकृष्ण लोखंडे, सचिव मदन भोसले आदींनी निवेदन दिले.