जयंती नाला ओसंडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयंती नाला ओसंडला
जयंती नाला ओसंडला

जयंती नाला ओसंडला

sakal_logo
By

L56063

सांडपाणी थेट पंचगंगेत
जयंती नाला ओसंडला; ‘दुधाळी’ही नदीत
कोल्हापूर, ता. १२ : शहर व परिसराला जोरदार पावसाने झोडपून काढले जात असल्याने पावसाच्या पाण्याबरोबरच विविध नाल्यांतील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. कालपासून जयंती नाला ओसंडून वाहत आहे, तर दुधाळी तसेच इतर अडवलेल्या नाल्यांमधील सांडपाणीही नदीत जात आहे.
दोन दिवसांपासून परतीच्या पावसाचा दणका सुरू आहे. अनेकवेळा काही भागांत जोराचा पाऊस होत आहे. त्यामुळे त्या परिसरातील पावसाचे वाहून येणारे पाणी नाल्यातून नदीत मिसळत आहे. पावसाळ्यात नाले अडवले जात नाहीत. पावसाचा जोर थोडा कमी झाल्यामुळे जयंती नाल्याला बरगे टाकून सांडपाणी अडवले होते. त्या सांडपाण्याचा उपसा करून सांडपाणी प्रक्रिया केंद्रात नेले जात होते; पण गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली. दोन दिवसांपासून तर झोडपून काढले जात आहे. त्यामुळे जयंती नाल्यातील पाण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे कालपासून सातत्याने नाला ओसंडत आहे. त्यामध्ये असलेल्या सांडपाण्यामुळे फेसाळलेले पाणी नदीत जात आहे. शिवाय दुधाळी नाल्यातील सांडपाणीही थेट नदीत जात आहे. शाम सोसायटी, तसेच तेथील अन्य नाल्यांतील पाणीही ओसंडून रंकाळा तलावात जात आहे.