ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून विविध मागण्या सादर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून विविध मागण्या सादर
ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून विविध मागण्या सादर

ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून विविध मागण्या सादर

sakal_logo
By

56130
-----------------
ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून विविध मागण्या सादर
भारतीय किसान संघ ः तहसीलदार, आजरा कारखान्याला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १३ ः ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. याबाबतचे निवेदन भारतीय किसान संघाने आजरा तहसीलदार व आजरा सहकारी साखर कारखान्याला दिले आहे. या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, एफआरपीची विनाकपात ऊस गाळपास गेल्यावर चौदा दिवसांच्या आत बिले आदा करून कायदेशीर हक्काचे संरक्षण करावे. वजन काट्याचे प्रमाणीकरण शासकीय विभागाकडून करून घ्यावे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सदोष काट्यामुळे घट दाखवून नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. ऊस तोडणी कामगारांकडून ऊस उत्पादकांची पिळवणूक होत आहे. कारखाना प्रशासनाकडून डोळेझाक होत असते. या विषयाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे. लूट करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. कारखान्याने एफआरपीचे वितरण घोषित करावे. कारखान्याने चालू गळीत हंगामामधील एफआरपी कशी निश्चित झाली आहे, त्याचे विवरण जाहीर करावे. उसाची तोडणी झाल्यानंतर चोवीस तासांच्या आत त्याचे वजन करावे. ऊस उत्पादन खर्च पाच वर्षांत दीड पटीने वाढला आहे. त्यामुळे ३० टक्के जादा ऊस दर मिळावा. जिल्हा उपाध्यक्ष बाळगोंडा पाटील, कोषाध्यक्ष अमरनाथ घुगरी, सचिव सचिन जाधव, गुरुप्रसाद हती, शेखर मोळदी, सुनील कराळे, बाळासो कोणकेरी, रामगोंडा पाटील, चंद्रकांत नेवडे, प्रकाश गोरुले, चंद्रकांत कोडोली, प्रमोद धनवडे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.