सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

sakal_logo
By

56195
----------------------------
सात लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
मानसिंग खोराटे; दौलत-अथर्व कारखान्याचा गळीत हंगाम प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १३ : अथर्व कंपनीच्या माध्यमातून दौलत कारखान्याच्या गळीत हंगामाचे हे चौथे वर्ष आहे. तीन वर्षांत कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. त्याच जोरावर यावर्षी सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याचे कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ केला.
श्री. खोराटे म्हणाले, ‘तालुक्यातील अन्य कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला जाईल. त्याबाबत शेतकऱ्यांनी चिंता करू नये.’ सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, ‘अथर्व-दौलतने शेतकरी कामगारांच्या बरोबरीने सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचा विश्वास संपादन केला आहे. यापुढील काळातही बँकेकडून कारखान्याला आर्थिक सहकार्य केले जाईल.’ संग्रामसिंह कुपेकर, ॲड. संतोष मळवीकर यांनी मनोगत व्यक्त केले. सिंधुदुर्ग बँकेचे संचालक गजानन गावडे, दौलतचे अध्यक्ष अशोक जाधव, ॲड. एन. एस. पाटील, शिवाजी सावंत, संचालक पृथ्वीराज खोराटे, चंदगडचे उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, नगरसेवक झाकीर नाईक, राजू रेडेकर, शांताराम पाटील, व्यवस्थापक नीलेश धुरी आदी उपस्थित होते.