खरेदी केंद्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरेदी केंद्रे
खरेदी केंद्रे

खरेदी केंद्रे

sakal_logo
By

धान्य खरेदीसाठी सात केंद्रांत व्यवस्था

कोल्हापूर, ता. १३ ः शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किमतीत भात व नाचणी खरेदी करण्यासाठी शासनाने जिल्ह्यातील सात केंद्रांना आज मंजुरी दिली. या केंद्रांवर संबंधित शेतकऱ्यांना आपल्या नावाची नोंद करावी लागणार आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना आपला सातबारा, ८ अ व आधार कार्ड सादर करावे लागणार आहे. शासनाने भातासाठी प्रतिक्विंटल २०४०, तर नाचणीसाठी ३५७८ रुपये आधारभूत किंमत निश्‍चित केली आहे. १५ ऑक्टोबर हा नाव नोंदणीचा अखेरचा दिवस आहे. या खरेदी केंद्रात चंदगड तालुका संघाचे तुर्केवाडी, अडकूर, आजरा तालुका भात खरेदी संघाचे आजरा, राधानगरी तालुका संघाचे राधानगरी, राधानगरी तालुका ज्योतिर्लिंग संघाचे पनोरी, जिल्हा कृषी उद्योग खरेदी विक्री संघाचे बामणी व भुदरगड तालुका संघाचे दासेवाडी या केंद्रांची निवड करण्यात आली आहे.