गोडसाखर बंद पाडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोडसाखर बंद पाडला
गोडसाखर बंद पाडला

गोडसाखर बंद पाडला

sakal_logo
By

56223
येणेचवंडी : विकासकाम उद्‌घाटनप्रसंगी कार्यक्रमात बोलताना राजेश पाटील. शेजारी बाळेश नाईक, जयसिंगराव चव्हाण, गंगाधर व्हसकोटी, अमर चव्हाण आदी.
------------------

षडयंत्र करून गोडसाखर बंद पाडला
आमदार राजेश पाटील : येणेचवंडीत अंतर्गत रस्ता, पाणंदचे उद्‌घाटन
सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. १३ : अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे व अमर चव्हाण यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला गडहिंग्लज साखर कारखाना षडयंत्र करून विरोधकांनी बंद पाडला. यातून शेतकरी सभासद व कामगारांचे विरोधकांनी नुकसान केले. अशा बेगडी लोकांच्या भूलथापांना बळी न पडता कारखान्याच्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवा, असे आवाहन आमदार राजेश पाटील यांनी केले.
येणेचवंडी (ता. गडहिग्लज) येथे अंतर्गत रस्ते व पाणंद रस्ताच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. सरपंच भारत झळके अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी सभापती अमर चव्हाण, बाळेश नाईक, जयसिंगराव चव्हाण, गंगाधर व्हसकोटी, जयकुमार मुन्नोळी, दीपक पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार पाटील यांनी कारखाना सभासदाच्या मालकीचा राहिला पाहिजे, असे सांगून गडहिंग्लज पूर्वभागाच्या पाणीप्रश्नासह विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे स्पष्ट केले.
अमर चव्हाण म्हणाले, ‘साखर कारखाना निवडणुकीत सहकार मोडीत काढणाऱ्यांचा पराभव करा. बाळेश नाईक यांनी येणेचवंडी लघू पाटबंधारे पाझर तलावावरील धोकादायक झुडपे हटवण्याची मागणी केली. यावेळी जयसिंग चव्हाण यांचेही भाषण झाले. उपसरपंच तानाजीराव कुराडे यांनी प्रास्ताविक केले. नीळकंठ कुराडे यांनी सूत्रसंचालन, तर बाळू बिरंजे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी ग्रा. पं. सदस्य दत्ता कांबळे, रेणुका बिरंजे, ताराबाई कुराडे, ग्रामसेविका विद्या नावलगी, पिंटू ऐवाळे, संदीप कुराडे, भैरू बिरंजे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.