मंडलिक बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडलिक बातमी
मंडलिक बातमी

मंडलिक बातमी

sakal_logo
By

‘अलायन्स’ चा क्षेत्रीय हब कोल्हापुरात व्हावा
..............
खासदार मंडलिक ः ३ नोव्हेंबरपासून नाईट लॅंडिंगचा मुंबईतील बैठकीत निर्णय
.....
कोल्हापूर, ता. १३ ः अलायन्स एअरवेजची कोल्हापूर-हैद्राबाद ही सेवा अनियमित सुरू असून या कंपनीने बेंगलोर विमानसेवा बंद केली आहे. या सेवा नियमित होण्यासाठी कोल्हापुरात या कंपनीचा क्षेत्रीय हब व्हावा, अशी मागणी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत केली. ३ नोव्हेंबरपासून कोल्हापुरात नाईट लँडिंगची सुविधाही सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत झाला.
हवाई वाहतूक मंत्रालयाचे मुख्य सचिव अजय यादव व अलायन्स एअरचे कार्यकारी संचालक विनोद सुद या बैठकीला उपस्थित होते. या कंपनीला शासनाने अनेक सुविधा देऊनही त्यांच्याकडून होत असलेल्या गैरसोयीबद्दल मंडलिक यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. पश्‍चिम महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील सुविधांचा विचार करून कंपनीने कोल्हापुरात आपला क्षेत्रीय हब सुरू करावा. आपली विमाने येथेच पार्किंग करावीत व याकरिता लागणाऱ्या भौतिक सुविधा केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून उभारण्याचे आश्‍वासन मंडलिक यांनी बैठकीत दिले.
..........