अर्बन बॅंकेसाठी ६४ उमेदवार रिंगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्बन बॅंकेसाठी ६४ उमेदवार रिंगणात
अर्बन बॅंकेसाठी ६४ उमेदवार रिंगणात

अर्बन बॅंकेसाठी ६४ उमेदवार रिंगणात

sakal_logo
By

अर्बन बॅंकेसाठी ६४ उमेदवार रिंगणात
छाननी शांततेत :
कोल्हापूर, ता. १३ : दि. कोल्हापूर अर्बन को.ऑप बॅंकेच्या पंधरा संचालकांच्या निवडणुकीसाठी सर्व गटांतून आलेल्या १०७ उमेदवारी अर्जापैकी आज छाननीनंतर ६४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दुबार अर्ज वगळता एकही अर्ज अपात्र झाला नाही किंवा कोणीही एकमेकांवर आक्षेप घेतला नसल्याने भरलेले सर्व अर्ज वैध ठरले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे काम पाहत आहेत.
अर्बन बॅंकेसाठी आज दुपारी १२ पासून अर्जांची छाननी झाली. सर्वच इच्छुकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आपआपल्या वकिलांसह उपस्थिती लावली. मात्र, कोणीही एकमेकांवर आक्षेप घेतले नसल्याने एकही अर्ज अपात्र ठरला नाही. त्यामुळे छाननी प्रक्रिया शांततेत झाली. सर्वसाधारण प्रतिनिधी गटात ४२, महिला गटात ७, इतर मागास वर्गीय ८, अनुसूचित जाती ४, विमुक्त जाती व भटक्‍या जमातींसाठी ३ अर्ज शिल्लक राहिले आहेत. यापैकी ४३ दुबार अर्ज बाजूला काढण्यात आले आहेत. दरम्यान, पात्र उमेदवारांचे अर्ज उद्या शुक्रवारी (ता. १४) दुपारी १ ला जाहीर केले जातील. याच दिवसापासून शुक्रवार (ता. २८) दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान अर्ज माघारी घेतले जातील. सोमवारी (ता. ३१) ला चिन्ह वाटप व १३ नोव्हेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत मतमोजणी व १५ नोव्हेंबरला सकाळी ८ पासून
निकाल जाहीर केला जाईल. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कार्यालय अधीक्षक उदय उलपे, मिलिंद ओतारी सहायक म्हणून काम पाहत आहेत.
..........

सर्वसाधरण प्रतिनिधी गट :
उमेश निगडे, अतुल बोंद्रे, आबाराव देशमुख, अशोक पोवार, प्रतापसिंह जाधव, रवींद्र सोळंकी, अजय इंगवले, कोमल राणे, संदीप पाटील, आदित्य जाधव, भास्कर जाधव, शिवाजी मोरे, चंद्रकांत सूर्यवंशी, अमोल डांगे, ओंकार कणेरकर, अनिकेत सावंत, सुचित मकोटे, सम्राट मांगुरे, प्रकाश जाधव, दीपक जाधव, यशराज निगडे, शिरीष कणेरकर, सुरेश कुमठेकर, जयसिंग माने, मधुसूदन सावंत, यशवंतराव साळोखे, राजन भोसले, प्रशांत शिंदे, नंदकिशोर मकोटे, अभिजित मांगुरे, संभाजी जगदाळे, रवींद्र धर्माधिकारी, रवींद्र गुरव, अजित पोवार, मंदार कणेरकर, निखिल धर्माधिकारी, कृष्णात तवटे, अभिजित बोंद्रे, अश्‍विनी तावरे, स्मिता माने, सुभाष भांबुरे आणि सचिन भांबुरे.
.....
महिला राखवी प्रतिनिधी :
गीता हासूरकर, आदिती जाधव, गीता जाधव, संध्या घोटणे, सुनीता राऊत, रुपाली बोंद्रे व स्मिता माने.
.....
विमुक्त जाती, भटक्‍या जमाती/ विशेष मागास वर्ग प्रतिनिधी :
एकनाथ काटकर, विश्‍वास काटकर व अश्‍विनी तावरे
....
अनुसूचित जाती/ जमाती सभासद प्रतिनिधी :
अशोक भास्कर, विजय पंडत, नामदेवराव कांबळे व रणजित कवाळे
...
इतर मागावर्गीय प्रतिनिधी :
मारुतराव कातवरे, सचिन भांबुरे, रवींद्र गुरव, संभाजी डोंगळे, रसिद बारगीर, सुभाष भांबुरे, प्रसाद बुलबुले व रवींद्र सोळंकी.
...