पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

टायर फुटून तरुण जखमी
कोल्हापूर : असळज (ता. गगनबावडा) येथे काल सायंकाळी ट्रॅक्टरच्या चाकात हवा भरत असताना टायर फुटून तरुण जखमी झाला. राजू पद्मनाभन नायर (रा. असळज) असे जखमीचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.
----------
भाजून एक जण जखमी
कोल्हापूर : सुळकूड (ता. कागल) येथे काल सायंकाळी चुलीजवळ ठेवलेल्या ज्वालाग्रही पदार्थाने पेट घेतल्याने उडालेल्या भडक्यात एक जण जखमी झाला. कृष्णात श्रीपती जाधव (वय ४७) असे जखमींचे नाव आहे. त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.
-----------
अपघातात एकाचा मृत्यू
कोल्हापूर ः भेंडवडे फाट्याजवळ वाहन घसरून झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. त्यांचा सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. शिवाजी शामराव पाटील (वय ५०, रा. नरंदे ता. हातकणंगले) असे त्यांचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ११) सायंकाळी घडली.