धरणे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धरणे आंदोलन
धरणे आंदोलन

धरणे आंदोलन

sakal_logo
By

हिवताप कर्मचाऱ्यांची
पुणे येथे निदर्शने
कोल्हापूर, ता. १३ : राज्यातील हिवताप विभागात काम करणाऱ्या आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक यांना पदोन्नती व कालबद्ध पदोन्नतीची मागणी केली आहे. या मागण्यांच्या पार्श्‍वभूमीवर २ नोव्हेंबरपासून पुणे येथील सहसंचालक आरोग्य सेवा यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा पी. एन. काळे यांनी दिला. आज पुणे येथे यासाठी निदर्शने झाली.
गेले वर्षभर हिवताप संघटनेने आंदोलने, निदर्शने याद्वारे मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तथापि, हिवताप कर्मचाऱ्यांना सदर मागणीचा लाभ मिळावा. यासाठी संघटनेचे राज्याध्यक्ष बाजीराव कांबळे आणि राज्य सरचिटणीस पी. एन. काळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर धरणे आंदोलन केली होती. आज पुणे येथे यासाठी निदर्शने केली. या वेळी आंदोलक पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मागणी तातडीने मंजूर न झाल्यास बेमुदत उपोषण करणार असल्याचे प्रशासनास सांगितले. या वेळी विविध जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.