अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा
अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा

अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा

sakal_logo
By

अनैतिक व्यापार प्रतिबंध
कायद्याची अंमलबजावणी करा

मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १३ : अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कायद्यांतर्गत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे गरजेचे आहे. या कायद्याचे परिपूर्ण ज्ञान घेऊन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.

महिला व बाल विकास विभाग आणि मुंबईच्या विपला फाउंडेशनच्या वतीने ‘अनैतिक व्यापार प्रतिबंध’ अधिनियमांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाहू छत्रपती सभागृहात चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रीतम पाटील उपस्थित होते.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक काकडे यांनी ‘लैंगिक शोषण’ याविषयी माहिती दिली. लैंगिक शोषणात समावेश असणारे घटक, लैंगिक शोषणाची कारणे, कोणाकडून तस्करी केली जाते, याविषयी माहिती देऊन लैंगिक शोषण रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यशाळेस विपला फौंडेशनचे अनिरुद्ध पाटील, प्रवीण कदम, नीलेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याची माहिती देऊन कार्यशाळा आयोजनाबाबत मार्गदर्शन केले. रोहिणी होणमारे यांनी आभार मानले.

यावेळी जिल्हा परीविक्षाधीन अधिकारी चंद्रशेखर तेली, व्ही. एन. चौगुले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे संलग्न वकील, मानवी वाहतूक विरोधी पथक, बाल कल्याण समिती सदस्य, बाल न्याय मंडळ सदस्य, महिला व बालकांसाठी कार्यरत विविध संस्थांचे, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.