खुल्या जागा, इमारतींच्या कर आकारणीसाठी शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खुल्या जागा, इमारतींच्या कर आकारणीसाठी शिबीर
खुल्या जागा, इमारतींच्या कर आकारणीसाठी शिबीर

खुल्या जागा, इमारतींच्या कर आकारणीसाठी शिबीर

sakal_logo
By

खुल्या जागा, इमारतींच्या कर आकारणीसाठी शिबीर
कोल्हापूर, ता. १३ ः शहरातील ज्या इमारतींवर, खुल्या जागेवर अद्यापही कर आकारणी केलेली नाही अथवा ज्यांनी अद्याप मिळकतीवर मालमत्ता कराची आकारणी करून घेतलेली नाही अशा मिळकतधारकांसाठी शिबीराचे आयोजन केले आहे. सोमवार (ता. १७) ते गुरुवार (ता.२०) या चार दिवसाच्या कालावधीमध्ये हे शिबिर होणार आहे. सोमवारी गांधी मैदान विभागीय कार्यालयातील घरफाळा विभागात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत हे शिबीर होणार आहे. मंगळवारी (ता.१८) शिवाजी मार्केटमधील घरफाळा विभागात, बुधवारी राजारामपूरी विभागी कार्यालयात तर गुरुवारी ताराराणी मार्केट येथील विभागीय कार्यालयात सकाळी १० ते ४ या वेळेत हे शिबिर होईल. यामध्ये यासाठी प्रॉपर्टी कार्ड, सातबारा उतारा, इंडेक्स उतारा, सेल डिड, कब्जेपट्टी, झोपडपट्टी कार्ड, बांधकाम परवानगी, प्रारंभ प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, प्रथम लाईट बिल, अपार्टमेंट असलेस बिल्डर, डेव्लपर यांचे पूर्ण नांव व पत्ता याबाबतची कागदपत्रे आणावीत. तसेच ज्या मिळकतींना यापूर्वी कराचे देयक येत होते परंतु आता येत नाही अशा मिळकतधारकांनी देयकाची छायांकीत प्रत व कर भरणा केलेल्या पावतीची छायांकीत प्रत आणावी. तरी संबंधीत मिळकतधारकांनी आवश्यक त्या कागदपत्रासह महापालिकेने ठरवून दिलेल्या दिवशी विभागीय कार्यालयात आपले अर्ज सादर करावेत असे आवाहन घरफाळा विभागाने केले आहे.