विद्यापीठ निवडणूक आरक्षण जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठ निवडणूक आरक्षण जाहीर
विद्यापीठ निवडणूक आरक्षण जाहीर

विद्यापीठ निवडणूक आरक्षण जाहीर

sakal_logo
By

लोगो ....
........

विद्यापीठ निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर

चार विद्याशाखांसाठी राखीव जागा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये चार विद्याशाखांमधील आरक्षण जाहीर करण्यात आले. अर्ज भरल्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराला प्रत्यक्ष सुरुवात होईल. शुक्रवार (ता.१५) पासून ऑफलाईन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. २८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा कार्यक्रम वेळापत्रकाप्रमाणे राबवला जात आहे. त्यानुसार पदवीधरांची मतदार नोंदणी, नोंदणी अर्जांची छाननी केली बुधवारी(ता.१२) मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली. आज राखीव जागांसाठी आरक्षण जाहीर केले. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेमध्ये १ जागा खुल्या प्रवर्गासाठी असून, एक जागा अनुसूचित जाती, जमातीसाठी आहे. वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याखेला १ जागा खुल्या प्रवर्गातील महिला तर दुसरी जागा भटके विमुक्त यांच्यासाठी आहे. मानव्य विद्याशाखेतील एक जागा खुल्या प्रवर्गासाठी असून, एक जागा अनुसूचित जातीसाठी आहे. आंतरविद्याशाखीय विद्याशाखेमधील १ जागा खुल्या प्रवर्गासाठी असून, ओबीसी साठी १ जागा राखीव आहे.