रिंगरोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिंगरोड
रिंगरोड

रिंगरोड

sakal_logo
By

56461

रिंगरोडची डागडुजी कधी होणार?
कोल्हापूर, ता. २१ : वाहनधारकांना शहराच्या पलीकडे लवकर पोहोचता यावे यासाठी रिंगरोड केला. आयआरबीने २००९ मध्ये उत्कृष्ट दर्जाचे काम केलेल्या या रस्त्याची डागडुजीही झालेली नाही. अर्धे सिमेंट आणि डांबरीकरण असलेल्या रस्त्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून चर पडत आहे. ती दुचाकी चालकांसाठी धोकादायक ठरत आहे. रस्त्याखालून पाईप घेण्यासाठी ठेवलेल्या डांबरी रस्त्यांचे पॅचवर्क मुरुमाने केल्याने वाहनधारकांचे कंबरडे मोडत आहे. शिवाजी विद्यापीठ ते आपटेनगर पाण्याच्या टाकीपर्यंत रस्ता धोकादायक सापळाच ठरत आहे. साळोखेनगरपासून नव्याने केलेला रस्ता तीन महिन्यांत उखडला असून, आता पॅचवर्कही अर्धवट केले आहे. शिवाय अमृत योजनेच्या पाणीपुरवठ्यासाठी जे चर मारले आहेत. त्यांचे अनेक महिने खडीकरण केलले नाहीत.
रस्त्यापेक्षा वर आलेले किंवा खोल असलेले मेनहोल अनेक ठिकाणी आहेत. ती चुकवण्यासाठी वाहन बाजूला घेताना छोटे-मोठे अपघात होत आहेत. रस्त्यावरचे पाणी जाण्यासाठीचे गटार रिकामी नसल्याने एवढे पाणी साठते की निम्मा रस्ता पाण्यातच जातो आणि अपघाताला निमंत्रण मिळत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होते. रस्त्यावर पावसात चिखल आणि ऊन पडल्यावर होणारी धुळही त्रासदायक होते. अनेक ठिकाणी नवनवीन पद्धतीने गतिरोधक तयार केले जात आहेत; पण त्यापैकी अनेक गतिरोधक अशास्त्रीय असल्याचे चित्र आहे.

कोट  
कोल्हापुरातील रस्त्यांबाबत सोशल मीडियावरही टिंगल होत आहे. याचे पालिका प्रशासनाला  सोयरसुतक नाही. 
- शामराव केळस्कर, नागरिक