महामार्गाचा बेळगाव-कागल टप्पा दिला भाडेतत्वावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गाचा बेळगाव-कागल 
टप्पा दिला भाडेतत्वावर
महामार्गाचा बेळगाव-कागल टप्पा दिला भाडेतत्वावर

महामार्गाचा बेळगाव-कागल टप्पा दिला भाडेतत्वावर

sakal_logo
By

५६५९८

महामार्गाचा बेळगाव-कागल
टप्पा दिला भाडेतत्त्‍वावर
ॲसेट मॉनेटायजेशन योजनेंतर्गत खासगी कंपनीकडे हस्तांतर

सकाळ वृत्तसेवा
बेळगाव, ता. १५ ः सरकारी संपत्तीचे मुद्रीकरण करण्याच्या योजनेचा भाग म्हणून राष्ट्रीय महामार्गाचा बेळगाव-कागलपर्यंतचा भाग भाडेतत्त्‍वावर देण्यात आला आहे. नॅशनल हायवे इन्‍फ्रा ट्रस्ट या कंपनीला ७८ किलोमीटर हा भाग भाडेतत्त्‍वावर देण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात बेळगाव ते हिरेबागेवाडीपर्यंतचा भागही भाडेतत्त्‍वावर दिला जाणार आहे.
केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्गांचे पाच भाग मुद्रिकरण योजनेतून भाडेतत्त्‍वावर देण्यात आले आहेत. त्यात बेळगाव-कागल, पालनपूर-अबूरोड, अबूरोड स्वरूपगंज, चितोडगड-कोटा व कोथकोटा-करनूल यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ३८९ किलोमीटरचा महामार्ग भाडेतत्त्‍वावर देण्यात आला आहे. केंद्र शासनाला पुढील तीन वर्षांत म्हणजे २०२५ पर्यंत महामार्गांच्या मुद्रीकरणातून एक लाख ६० हजार कोटींचा निधी उभा करावयाचा आहे. त्यासाठी २६ हजार ७०० किलोमीटरचे म्हणजे देशातील २२ टक्के राष्ट्रीय महामार्ग भाडेतत्त्‍वावर दिले जाणार आहेत. त्याची सुरूवात झाली आहे. त्यात बेळगाव-कागलचाही समावेश आहे. बेळगावहून बंगळूरकडे जाताना हिरेबागेवाडीपर्यंतचा भागही भाडेतत्त्‍वावर देण्याचा निर्णयही आधीच झाला आहे; पण त्याची अंमलबजावणी दुसऱ्या टप्प्यात होईल.
गतवर्षी ऑगस्टमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी नॅशनल मॉनेटायजेशन पाईपलाईन योजना जाहीर केली होती. त्यानुसार देशातील सरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या मालकीची एकूण सहा लाख कोटींची मालमत्ता खासगी कंपन्यांना भाडेतत्त्‍वावर दिली जाणार आहे. त्यात राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, विमानतळ, वीजनिर्मिती प्रकल्प, पाईपलाईन्स, जमिनी व इमारतींचा समावेश आहे. या निर्णयानंतर लगेचच राष्ट्रीय महामार्गांच्या मुद्रीकरणासाठी कोणते विभाग निवडले जावेत, यासाठीचे काम सुरू झाले होते.

पुढे काय करणार याची उत्सुकता
पुणे-बंगळूर महामार्गाचा भाग असलेल्या बेळगाव-कागलपर्यंतचा रस्ता दर्जेदार आहे. सुवर्ण चतुष्कोन योजनेतून पूंज लॉईड कंपनीने महामार्ग तयार केला आहे. या भागाची देखभाल कंपनीने केली; पण आता या भागाची तात्पुरती मालकी नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्टकडे असणार आहे. कर्नाटक व महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा हा महामार्ग व्यापारी दृष्टीनेही खूपच महत्वाचा आहे. त्यामुळेच महामार्ग मुद्रीकरण झाल्यानंतर या रस्त्यावर नेमके काय केले जाणार, याबाबत उत्सुकता आहे.