अंधमुक्त महाराष्ट्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंधमुक्त महाराष्ट्र
अंधमुक्त महाराष्ट्र

अंधमुक्त महाराष्ट्र

sakal_logo
By

डॉ. लहाने यांचा फोटो वापरावा
.....

‘मोतिबिंदू’साठी ३५० शस्त्रक्रिया केंद्रांची उभारणी
...................
‘अंधमुक्त महाराष्ट्र’ मोहीम; पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्यावर जबाबदारी
..................
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः डोळ्यांशी संबंधित मोतिबिंदूसह काचबिंदू व तिरळेपणावर शस्त्रक्रिया करण्यासाठी राज्यात ३५० स्वतंत्र शस्त्रक्रिया केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात येणाऱ्या ‘अंधमुक्त महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत हे काम होणार असून, येत्या तीन वर्षांत महाराष्ट्रात विविध कारणांनी अंधत्व आलेल्या रुग्णांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न असणार आहे. या मोहिमेची संपूर्ण जबाबदारी जे. जे. रुग्णालयातील ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्यावर सोपविण्यात आली.
१ नोव्हेंबरपासून ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात याचे सर्वेक्षण होईल. त्यात मोतिबिंदू, काचबिंदू, लहान मुलांतील तिरळेपणा झालेल्या रुग्णांची माहिती संकलित होईल. तीन ते चार महिन्यांत हा सर्व्हे पूर्ण होईल. त्यानंतर आरोग्य विभागासह सामाजिक न्याय, स्वयंसेवी संस्था व शासनाच्या विविध विभागांच्‍या मदतीने प्रत्यक्ष तपासणी व शस्त्रक्रियेची मोहीम आखली जाणार आहे. यासाठी आवश्‍यक असणारी शस्त्रक्रिया केंद्रे प्रत्येक जिल्ह्याच्या तालुका पातळीवर नव्याने सुरू करण्यात येणार आहेत.
या मोहिमेसाठी वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व सेवा एकत्रित आणण्यात येतील. मधुमेह हे मोतिबिंदू होण्याचे प्रमुख कारण आहे. मधुमेही लोकांना दहा वर्षांनी अंधत्व येण्याचा धोका आहे. तत्पूर्वीच, हे अंधत्व टाळता येणे शक्य असून, हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. लहान मुलांतील तिरळेपणाचे रुग्णही भरपूर आहेत. अशा प्रकारात एका डोळ्याला अंधत्व येऊ शकते, त्यामुळे या लहान मुलांची शोधमोहीम या मोहिमेत होणार आहे. महाराष्ट्रात २७ लाख अंध लोक आहेत. यापैकी दोन वर्षांत १७ लाख रुग्णांवर उपचार करण्याचे नियोजन मोहिमेत आहे.

.............
मधुमेह प्रमुख कारण
काचबिंदू व मोतिबिंदू झाल्यावर अंधत्व येण्याचा सर्वाधिक धोका मधुमेही लोकांना आहे. मधुमेही लोकांच्या डोळ्यामागील पडदा (रेटिना) कमजोर होऊन त्यात रक्तस्राव होतो व त्यामुळे अंधत्‍व येते. वेळीच अशा रुग्णांवर लेसर उपचार केल्यास हा धोका कमी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मधुमेही लोकांची संख्या ३० लाखांच्या आसपास आहे. व्यापक प्रमाणात ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
.................

डॉ. लहाने यांच्याविषयी...
डॉ. तात्याराव लहाने हे सध्या जे. जे. रुग्णालयात नेत्रतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व राज्याचे आरोग्य संचालक म्हणूनही उत्तम काम केले. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आतापर्यंत दीड लाखाहून अधिक डोळ्यांवरील शस्‍त्रक्रिया केल्या. विशेषतः मेळघाट आणि आदिवासीबहुल भागात त्यांनी मोठे कार्य केले आहे.