चित्पावन संघातर्फे विविध उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चित्पावन संघातर्फे विविध उपक्रम
चित्पावन संघातर्फे विविध उपक्रम

चित्पावन संघातर्फे विविध उपक्रम

sakal_logo
By

दिवाळीनिमित्त महिलांसाठी
खरेदी विक्री स्टॉल उपक्रम
कोल्हापूर : चित्तपावन संघातर्फे ज्ञाती बांधवांसाठी मंगळवारी (ता. १८), बुधवारी (ता. १८) ब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या बेसमेंट हॉल येथे सकाळी दहा ते रात्री नऊपर्यंत दिवाळी खरेदी विक्री स्टॉल उपक्रम घेण्यात येणार आहे. या वस्तू प्रदर्शन आणि विक्री मेळाव्यात विविध प्रकारच्या गृहपयोगी वस्तू, दिवाळीनिमित्त सजावट साहित्य, खाद्यपदार्थ स्टॉल, नावीन्यपूर्ण फराळाचे स्टॉल एका छताखाली उपलब्ध होणार आहेत. महिलांमध्ये उद्योगशीलता वाढावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना स्थानिक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या हेतूनेच हा उपक्रम घेण्यात येणार आहे. कोल्हापूरकरांनाही आपल्या भगिनींना तयार केलेल्या वस्तू वाजवी दरात उपलब्ध होणार आहेत. मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.