सं पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सं पट्टा
सं पट्टा

सं पट्टा

sakal_logo
By

दौलतराव निकम यांची जन्मशताब्दी
वैचारिक उत्सव म्हणून साजरा करणार

सिद्धनेर्ली, ता.१५ः ः ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व माजी आमदार दौलतराव निकम यांची जन्मशताब्दी सामाजिक, वैचारिक उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. व्हन्नूर (ता.कागल ) येथे दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयात ही बैठक झाली. आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘दौलतराव निकम यांचा आदर्श समाजासमोर कायम राहावा. यासाठी कागल शहरात त्यांचा भव्य पुतळा उभारू. तसेच त्यांच्या जन्मगावी त्यांच्या नावे स्वागत कमान उभारण्यात पुढाकार घेऊ.’ यावेळी माजी आमदार संजय घाटगे, भैया माने, शाहीर सदाशिव निकम, धनराज घाटगे, प्रा. सुनील मगदूम, विजय कुरणे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीत वर्षभर रक्तदान शिबिर, पशुवैद्यकीय शिबिर, रोगनिदान शिबिर, व्याख्याने, विविध स्पर्धा, स्मरणिका प्रकाशन व मुख्य सांगता समारंभ अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले. बैठकीस सरपंच पूजा मोरे, उपसरपंच मंगल कोकणे उपस्थित होते.

.......

गारगोटीत ‘सारथी’ जनजागृती मेळावा
गारगोटी, ता. १५ : मराठा समाजासाठी कार्यरत असणाऱ्या सारथी संस्थेच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी येथे छत्रपती संभाजीराजे फाउंडेशनच्या वतीने सारथी जनजागृती मेळावा झाला. ‘सारथी’चे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी डॉ. विलास पाटील प्रमुख मार्गदर्शक होते. डॉ. पाटील यांनी सारथी संस्था मराठा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आर्थिक साहाय्य करते, यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कसा आर्थिक लाभ देते, याची माहिती दिली. तसेच एनएमएमएस स्कॉलरशिप, परदेशी शिक्षण घेण्यासाठी आर्थिक योजना, आयआयटी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत, पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरमहा मिळणारी आर्थिक मदत या सर्व योजनांची माहिती दिली. सचिन भांदिगरे यांनी प्रास्ताविक केले. छत्रपती संभाजीराजे फाउंडेशनचे समन्वयक उदय घोरपडे यांनी तालुकानिहाय सारथी जनजागृतीचे मेळावे घेणार असल्याचे सांगितले.
.......

कौलवमध्ये मान्यवरांचा सत्कार
शाहूनगर ः कौलव (ता. राधानगरी) येथील शहीद जवान स्वप्नील चरापले यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त स्वप्नील चरापले फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच सविता चरापले होत्या. पंकज पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रवीकुमार जाधव (पिंपळवाडी), मारुती पाटील (इटकरे), महेश डोंगळे (घोटवडे), विजय पाटील (शिरगाव) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. ओंकार चरापले, सुदर्शन चरापलेंसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. यावेळी भोगावतीचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, धैर्यशील पाटील, चंद्रकांत पाटील, माजी उपसभापती रवीश पाटील यांची भाषणे झाली.
.........