इचल : डीकेटीई वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : डीकेटीई वृत्त
इचल : डीकेटीई वृत्त

इचल : डीकेटीई वृत्त

sakal_logo
By

फोटो फाईल - ich१५३.jpg
56574
इचलकरंजी ः डीकेटीईमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स इन डाटा सायन्स लॅबचे उद्घाटन करताना डॉ. प्रशांत पानसरे, डॉ. सपना आवाडे, डॉ एल. एस. आडमुठे आदी.

‘डीकेटीई’मध्ये रुबीस्केपचे सेंटर ऑफ एक्सलन्स
इचलकरंजी, ता. १५ ः येथील डीकेटीईमध्ये रुबीस्केप यांच्या संयुक्त विद्यमानाने अर्टिफिशिएल इंटेलिजीएन्स, डाटा सायन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्स्मधील सेंटर ऑफ एक्सलन्स केंद्र सुरू झाले. रुबीस्केप भारतातील पहिली युनिफाईड डेटा सायन्स प्लॅटफॉर्म कंपनी आहे. रुबीस्केप इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रशांत पानसरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी सचिव डॉ. सपना आवाडे, प्रभारी संचालक डॉ सौ. एल.एस. आडमुठे प्रमुख उपस्थित होत्या.
डॉ. पानसरे म्हणाले, ‘भारतीय महत्वाकांक्षी डेटा सायंटिस्टना करिअरसाठी सक्षम बनविण्यासाठी डीकेटीईसोबत भागीदारीस रुबीस्केप कंपनी उत्सुक आहे. उत्पादन इन्क्युबीएशन आणि स्टार्टअपचा वेग वाढविणे हे सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआय-डीएस, आयओटीची उद्दिष्टे आहेत. सीएसई, मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल विद्यार्थ्यांसाठी हे प्रभावी साधन होईल.’
सौ. सपना आवाडे म्हणाल्या, ‘सेंटर ऑफ एक्सलन्समुळे अ‍ॅनेलिटीक स्कील डेव्हलप करण्यावर भर दिला असून त्याचा उपयोग प्रोग्रॅमिंग स्किलमध्ये होईल. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाची सुविधा देण्यास डीकेटीई नेहमीच अग्रेसर राहील.’ आडमुठे म्हणाल्या, ‘सेंटरमुळे डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना डाटा सायन्स टॅलेंटपूल विकसित करण्याची संधी मिळेल, जे उद्योगाच्या उदयोन्मुख आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक साधन होतील.’ याप्रसंगी उपसंचालक प्रा. डॉ यु. जे. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विभागप्रमुख डॉ. डी. व्ही. कोदवडे, डॉ. व्ही. आर. नाईक उपस्थित होते.