सकाळ वाचन प्रेरणा दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ वाचन प्रेरणा दिन
सकाळ वाचन प्रेरणा दिन

सकाळ वाचन प्रेरणा दिन

sakal_logo
By

56606
.........

वाचन संस्कृती जोपासूया
---
‘सकाळ''तर्फे विविध शाळांत वाचन प्रेरणा दिन, सामूहिक वाचनाबरोबरच वाचन संस्कृतीवर मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र वाचन प्रेरणा दिन साजरा झाला. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या न्यूजपेपर इन एज्युकेशन (एनआयई)तर्फे शहर आणि जिल्ह्यातील विविध शाळांत यानिमित्त विविध कार्यक्रम झाले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमापूजनाबरोबरच वाचन संस्कृतीवर शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. विविध ग्रंथांचे पूजन करून वाचन संस्कृती जोपासण्याचा निर्धार यानिमित्त शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केला.
उपक्रमात सहभागी शहर व जिल्ह्यातील शाळा अशा ः पद्माराजे हायस्कूल, न्यू हायस्कूल, रा. ना. सामाणी हायस्कूल, कोल्हापूर इंग्लिश मीडियम स्कूल, महाराष्ट्र हायस्कूल व गर्ल्स हायस्कूल, नागोजीराव पाटणकर हायस्कूल (शिवाजी पेठ), इंदुमतीदेवी हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल, म.ल.ग. हायस्कूल, नूतन मराठी विद्यालय (भवानी मंडप), प्रायव्हेट हायस्कूल, पी. आर. मुंडरगी इंग्लिश मीडियम स्कूल (मंगळवार पेठ), राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल (तोरस्कर चौक), दत्ताबाळ प्राथमिक विद्यालय (कसबा बावडा), प्रबुद्ध भारत हायस्कूल (लक्षतीर्थ वसाहत), गुरुदत्त विद्यानिकेतन (फुलेवाडी), अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल (वांगी बोळ), देशभूषण हायस्कूल (लक्ष्मीपुरी), कळंबा गर्ल्स हायस्कूल (कळंबा), तपोवन हायस्कूल (तपोवन), देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार हायस्कूल (आर. के. नगर), जरगनगर हायस्कूल (जरगनगर), कंदलगाव प्राथमिक शाळा (कंदलगाव), व्ही. जे. पाटील हायस्कूल (कंदलगाव), उषाराजे हायस्कूल, तवणाप्पा पाटणे हायस्कूल, श्रीराम हायस्कूल (राजारामपुरी), सरस्वती चुनेकर विद्यालय (प्रतिभानगर), वि. स. खांडेकर प्रशाला (शाहूपुरी), शा. कृ. पंत वालावलकर (मुक्त सैनिक वसाहत), शिशु कुंज विद्यामंदिर (वांगीबोळ), कोरगावकर हायस्कूल (सदर बाजार), माझी शाळा, समता हायस्कूल (कदमवाडी), समर्थ विद्यामंदिर, भाई माधवराव हायस्कूल (उचगाव), बी. वाय. हायस्कूल (पेठवडगाव), खोची हायस्कूल (खोची), किणी हायस्कूल (किणी), काळू मास्तर विद्यालय, बॅरिस्टर नाथ पै विद्यालय (गडहिंग्लज), जरळी हायस्कूल (जरळी), साधना विद्यालय (शेंद्री), मलिग्रे हायस्कूल (मलिग्रे), हिरण्यकेशी विद्यालय (नूल), राणी विजयादेवी हायस्कूल (सेनापती कापशी), मारुतराव वारके विद्यालय (तुरंबे), ताबळेश्वर हायस्कूल (तांबवे), विद्यामंदिर (बोरपाडळे), नेहरू हायस्कूल (कोतोली), न्यू इंग्लिश स्कूल (पोर्ले तर्फ ठाणे), विठ्ठल पाटील माध्यमिक विद्यालय (कळे), विद्यामंदिर (चांदोली).