अंध रॅली- सफेद काठी दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंध रॅली- सफेद काठी दिन
अंध रॅली- सफेद काठी दिन

अंध रॅली- सफेद काठी दिन

sakal_logo
By

56549
कोल्हापूर ः जागतिक सफेद काठी दिनानिमित्त शनिवारी शहरातून अंध बांधवांनी भव्य फेरी काढली. (नितीन जाधव ः सकाळ छायाचित्रसेवा)

सफेद काठीदिनानिमित्त
अंध बांधवांची फेरी
‘नॅब’तर्फे गरजू अंधांना मोफत सफेद काठींचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : जागतिक सफेद काठी दिनानिमित्त आज नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड (नॅब) संस्थेतर्फे आज शहरातून भव्य फेरी काढण्यात आली. सफेद काठीबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने निघालेल्या या फेरीत अंध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्याशिवाय गरजू अंधांना मोफत सफेद काठींचे वितरण झाले.
वाहतूक पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्या हस्ते फेरीला प्रारंभ झाला. या वेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे अध्यक्ष विजयकुमार यवलुजे, सचिव भूषण शेंडगे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर डोंगरे, सचिव विजय रेळेकर, संचालक शिवानंद पिसे, डॉ. मीना डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. शाहूपुरी, फोर्ड कॉर्नर, लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशन, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, उमा टॉकीजमार्गे ही फेरी रामभाई सामाणी हॉलमध्ये आली. येथे बावन्न अंधांना सफेद काठीचे वितरण झाले. (कै.) लक्ष्मण ठाकूर व (कै.) शचिंद्र ठाकूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पंधरा अंधांना दहा हजार रुपयांप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात आली. प्रवीण कांबळे, प्रसाद लोखंडे, सौरभ चौगुले, ओंकार देसाई, बसवराज पाटील, रोहन लाखे, रॉजर कुतीनो, अथर्व कोळेकर, ओमकेश चव्हाण, पवन कागले, माधव नाईक, सादिक अत्तार, आदित्य पाटील, ओंकार गुरव, संग्राम कांबळे यांचा त्यामध्ये समावेश होता. जिया मोमीन यांनी सूत्रसंचालन केले.
--------------
गुजरीत आज कार्यक्रम
श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट, अरिहंत जैन फाउंडेशन, भारतीय जैन संघटनेतर्फे उद्या (रविवारी) सकाळी अकरा वाजता सफेद काठी दिन कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रीय दृष्टीहीन संस्थेच्या सदस्यांना लाल पांढरी काठीचे वितरण होणार असून, दृष्टीहीन सदस्यांचा छोटेखानी स्नेहमेळावा होणार आहे. गुजरीतील जैन मंदिर मरुधर भवनात हा कार्यक्रम होईल.