रिक्षाचालकांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षाचालकांचा सत्कार
रिक्षाचालकांचा सत्कार

रिक्षाचालकांचा सत्कार

sakal_logo
By

रिक्षाचालक मदन ठोंबरे यांचा सत्कार
कोल्हापूर, ता. १५ : भटक्या कुत्र्यांना स्वतःच्या खर्चातून रोज खाऊ घालणाऱ्या कसबा बावडा येथील रिक्षाचालक मदन ठोंबरे यांचा रोटरॅक्ट क्लब ऑफ करवीर व्हिजन कोल्हापूरतर्फे सत्कार करण्यात आला. ‘रोटरॅक्ट’तर्फे फीडर्स प्रकल्प हा भटक्या कुत्र्यांना, जनावरांना खाऊ घालण्याचा उपक्रम सुरू आहे. दसरा चौक, कसबा बावडा, ताराबाई पार्क परिसरातील भटक्या कुत्र्यांना खाऊ क्लबच्या सदस्यांमार्फत डॉग फूड दिले जाते. दिल्ली येथील रोटरॅक्ट क्लब ऑफ अशोका आर्टियन्स यांच्या पुढाकारातून हा उपक्रम येथे राबविण्यात येत आहे. या माध्यमातून रिक्षाचालक ठोंबरे यांची माहिती मिळाली. यासाठी त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे क्लबच्या सदस्या सृष्टी पाटील यांनी सांगितले. ठोंबरे यांना क्लबतर्फे शाल, बुके देऊन सन्मानित करण्यात आले. क्लबच्या सदस्या गायत्री आणेकर, दिव्या गरड, अभिषेक शिंदे, चेतन सरनाईक, शुभम साळे, सौरभ कुलकर्णी आदी उपस्थित होते.