ऑक्टोबरच्या पंधरा दिवसात १२९.३ मिली पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑक्टोबरच्या पंधरा दिवसात १२९.३ मिली पाऊस
ऑक्टोबरच्या पंधरा दिवसात १२९.३ मिली पाऊस

ऑक्टोबरच्या पंधरा दिवसात १२९.३ मिली पाऊस

sakal_logo
By

पंधरा दिवसांत १२९.२ मिमी पाऊस
सर्वाधिक गगनबवडा तालुक्यात ; भात, सोयाबीन, भुईमूगाचे नुकसान

कोल्हापूर, ता. १५ ः जिल्ह्यात ऑक्टोबरच्या १५ दिवसांत तब्बल १२९.२ मिलिमिटर पाऊस पडला. सर्वसाधारणपणे या महिन्यात ५५ ते ६० मिलीमीटर पाऊस पडतो. या महिन्यात सर्वाधिक पाऊस गगनबवडा तालुक्यात पडला असून तेथे २८२.९ मिलीमीटर पाऊस पडला आहे. पावसाच्या वाढलेल्या प्रमाणामुळे भात, सोयाबीन, भुईमूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज मात्र पावसाने उघडीप दिली. ऋतुमानाचे वेळापत्रक बिघडल्याने यंदा ऑक्टोबरमध्येही पावसाने जोर धरला. हा मान्सूनच्या परतीचा कालावधी असूनही गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने ऑक्टोबरमध्ये दमदार बरसात केली. पंधरा दिवसांत एक-दोन दिवसांचा अपवाद सोडल्यास रोज पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत या महिन्यात जवळपास दुपटीपेक्षा जास्त पाऊस झाला. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला असून त्याखालोखाल हातकणंगलेमध्ये पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांचे बरेच नुकसान केले आहे. विशेषतः भात, सोयाबीन, भुईमूग यांचे नुकसान अधिक आहे.
--------------------------------------
पंधरा दिवसांतील पाऊस (मिलीमीटर)

तालुका सर्वसाधारण पाऊस यंदाचा पाऊस
हातकणंगले ४७.५ २०५.२
शिरोळ ४८.१ १४३.९
पन्हाळा ४७.३ १६३.४
शाहूवाडी ४९.९ १३९.८
राधानगरी ४७.७ ८०.७
गगनबावडा ११०.५ २८२.९
करवीर, शहर ४९.८ १३०.२
कागल ५३ १००.५
गडहिंग्लज ५३.५ ७६.१
भुदरगड ५३.१ १०६.४
आजरा ४४.१ ८५.६
चंदगड ५८ ९८.८
एकूण ५५ १२९.२
-----------------------------------------------------------------------------------
पंधरा दिवसांत जिल्ह्यातील नुकसान
मृत व्यक्ती - १
मृत जनावरे - १५
पडलेली घरे - ८
अंशतः पडलेली घरे - ३३४