...तरच वाचनाला अर्थ प्राप्त होतो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...तरच वाचनाला अर्थ प्राप्त होतो
...तरच वाचनाला अर्थ प्राप्त होतो

...तरच वाचनाला अर्थ प्राप्त होतो

sakal_logo
By

56651
-----------------
...तरच वाचनाला अर्थ प्राप्त होतो
किरण गुरव : ‘शिवराज’मध्ये लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १६ : ‘‘लेखकांनी अनुभवलेले भावविश्व त्यांनी लिहिलेल्या साहित्यात उमटलेले असते. त्याचे डोळसपणे वाचन करून लेखनाशी समरस होणे आवश्यक आहे. त्याच्याशी एकरूप झाले तरच वाचनाला अर्थ प्राप्त होतो,’’ असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कथाकार किरण गुरव यांनी केले.
येथील शिवराज महाविद्यालयात ग्रंथालय, वाङ्‌मय व सर्व भाषा विभागातर्फे लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रम झाला. त्या वेळी श्री. गुरव बोलत होते. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, ‘‘आपण जे-जे पाहिले, अनुभवले, ते-ते साहित्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या आधुनिकतेमध्ये तंत्रज्ञानाने पुस्तके तुमच्यापर्यंत आणलेली आहेत. मात्र, वाचकांनी ती डोळसपणे वाचली पाहिजेत.’’ संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे म्हणाले, ‘‘वाचनातून व्यक्तिमत्त्व सुधारते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचनप्रेमी बनले पाहिजे. त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.’’ डॉ. कदम यांचेही भाषण झाले. ग्रंथपाल संदीप कुराडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. आनंदा कुंभार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्यावर आधारित भित्तिपत्रकाचे अनावरण श्री. गुरव यांनी केले. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, प्रा. बीना कुराडे, पर्यवेक्षक तानाजी चौगुले आदी उपस्थित होते. प्रा. अशोक मोरमारे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी. यू. जाधव यांनी आभार मानले.
-----------------------
* उत्कृष्ट वाचक पुरस्कार...
शिवराज महाविद्यालयाच्या ग्रंथालयातर्फे उत्कृष्ट वाचकांना गौरवले. डॉ. एन. आर. कोल्हापुरे, प्रा. पी. एल. यमगेकर, प्रा. लोहिता माने यांना उत्कृष्ट वाचक शिक्षक, सचिन मगदूम, अमन ऊर्फ जुनेद पटेल, तेजस्विनी पाटील यांना उत्कृष्ट वाचक विद्यार्थी, तर विशाखा जोशी, गोपाल सबनीस यांना उत्कृष्ट वाचक म्हणून गौरवले.