इचलकरंजीत वाचन संस्कृतीला उजाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत वाचन संस्कृतीला उजाळा
इचलकरंजीत वाचन संस्कृतीला उजाळा

इचलकरंजीत वाचन संस्कृतीला उजाळा

sakal_logo
By

ich166,7.jpg
56690
इचलकरंजी : १) डीकेएएससी महाविद्यालयात ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शन भरवले.
56691
२) पंचशील हायस्कूल येथे वृत्तपत्र विक्रेते विजय वाईंगडे यांचा सन्मान करण्यात आला.
३) 03772
कुंभोज : वृतपत्र विक्रेते महाबली बड्डे यांचा सत्कार करताना गोमटेश बेडगे. शेजारी अनिल हिंगलजे, नेमिनाथ बाळीकाई, रवींद्र देसाई.

४) 01377
इचलकरंजी : वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त माधव विद्यामंदिरातर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार केला.

------
इचलकरंजीत वाचन संस्कृतीला उजाळा
शाळा, सामाजिक संस्थांतर्फे कलाम यांच्या जन्मदिनी विविध उपक्रम
इचलकरंजी, ता. १६ : शहरात शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्थांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिन विविध उपक्रमांनी साजरा करत वाचन संस्कृतीला उजाळा दिला. कलाम यांचा जन्म दिन वाचन प्रेरणा दिन आणि वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा होत असल्याने वाचनाचा जागर मोठ्या प्रमाणात केला. यंदा शाळा, महाविद्यालयांमध्ये आवर्जून वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. वाचन संस्कृती समृद्ध करणारी व्याख्याने, स्पर्धा यासह ठिकठिकाणी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले होते. प्रत्येक शाळांनी डॉ. कलाम यांना विद्यार्थी वेशभूषेत अवतरून त्यांचे प्रेरणादायी जीवन कार्य अनुभवले.

*इचलकरंजी महानगरपालिका
प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. श्री. देशमुख यांनी कलाम यांच्या जीवन कार्याची ओळख करून देत देशाच्या प्रशासन कार्यातील योगदान स्पष्ट केले. जल अभियंता सुभाष देशपांडे, उद्यान पर्यवेक्षक सुनील बेलेकर, वृक्ष अधिकारी संपत चव्हाण, जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे, सहायक क्रीडा अधिकारी संजय कांबळे, महाराष्ट्र सुरक्षा दल पर्यवेक्षक उमाजी कणसे, मारुती जाधव, सचिन शेडबाळे आदी उपस्थित होते.

*प्रबोधन वाचनालय
किमान एक वृत्तपत्र व पुस्तक घरात वाचनासाठी उपलब्ध असले पाहिजे. त्याद्वारे आपले कुटुंब, समाज व राष्ट्र बलशाली करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तीच कालवश डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत रामदास कोळी यांनी व्यक्त केले. ते प्रबोधन वाचनालयातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते सुरेश चौगुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. ग्रंथ प्रदर्शनामध्ये विविध विभागांतील तीस हजारांहून अधिक ग्रंथांची मांडणी केली आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन प्रसाद कुलकर्णी यांनी केले.

* सरस्वती हायस्कूल
डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन वृत्तपत्र विक्रेते आप्पा पाटील यांनी केले. त्यांनी पुस्तक वाचनासाठी एक तास राखून ठेवा, कारण चांगल्या बँकेपेक्षा चांगल्या पुस्तकांमध्ये खरी संपत्ती असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी वृत्तपत्र वाचन, गोष्टी, कथा कादंबरी, कविता यांचे वाचन केले. ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या आर्टिस्टिक पेअर इव्हेंटमध्ये महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल माजी विद्यार्थिनी प्रज्ञा गायकवाड व सानिका जाधव, मार्गदर्शक नीलेश कागिनकर यांचा सत्कार केला. मुख्याध्यापक पी. डी. शिंदे, आर. एन. जाधव, पी. जी. हजगूळकर, संजय रेंदाळकर, एस. जे. साळुंखे, महावीर कांबळे आदी उपस्थित होते. एस. व्ही. बसागरे यांनी आभार मानले.

* विकास विद्यामंदिर
विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वृत्तपत्राचे वाटप करून त्यांना वाचनाविषयी प्रेरणा जागृत केली. आर्यन सूर्यवंशी या विद्यार्थ्यांनी ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची वेशभूषा करून मनोगत व्यक्त केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन केले.

* माई बाल विद्यामंदिर
डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन संतोष शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. लेखक व कवी यांच्या वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ‘सकाळ एनआयई’ अंकाचे प्रकाशन केले. मुख्याध्यापिका शैला कांबरे यांनी डॉ. कलाम यांचा जीवनपट गोष्टी रूपातून सांगितला. विद्यार्थ्यांनी गोष्टीच्या पुस्तकांचे व ‘सकाळ’ वर्तमानपत्राचे वाचन केले. तसेच विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरवले होते. निर्मला ऐतवडे, आरती पाटील, लता नाईक उपस्थित होते.

* मथुरा शिक्षण संस्था
मथुरा शिक्षण संस्थेत स्थानिक वृत्तपत्र विक्रेता आनंदा दिवटनकर यांचा सत्कार केला. डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन विवेक शेळके यांच्या हस्ते केले. मुख्याध्यापक आनंदा खोंद्रे यांनी प्रास्ताविक केले. अनुजा पाटील, पूर्वा धुमाळे, रोहित कबाडे या विद्यार्थ्यांनी वृत्तपत्र विक्रेता म्हणून काम केले. अन्य विद्यार्थ्यांनी कथा, कविता, वृत्तपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन एस. जी. चव्हाण यांनी केले. आभार डी. बी. पाटील यांनी मानले.

* साई इंग्लिश स्कूल
मुख्याध्यापक आर. एन. आळतेकर यांच्या हस्ते व प्राथमिक विभागाचे प्रमुख मिलिंद कांबळे, गजानन लवटे, पूजा फडतारे यांच्या उपस्थितीत डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचन, वृत्तपत्र वाचन केले. डॉ. कलाम यांच्या कार्याचा परिचय वैशाली सागावकर यांनी केला. स्नेहल कुलकर्णी यांनी वृत्तपत्रे काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले.

*चौगुले प्राथमिक विद्यामंदिर
डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. पी. जे. बडबडे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे सेक्रेटरी तीर्थकर माणगावे यांनी लोकसहभागातून जास्तीत जास्त पुस्तके जमा करून पुस्तकपेढी तयार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. राज सय्यद यांच्या हस्ते वेद या भित्तीपत्रकाचे अनावरण केले. ‘सकाळ’च्या एनआयई अंकाचे प्रकाशन झाले. रवी पाटील, सी. डी. लडगे, आप्पासाहेब तेरदाळे, राजेंद्र खंडेराजुरी आदी उपस्थित होते. स्वागत व पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापिका वर्षा हुल्ले यांनी करून दिला.

* ताराबाई गर्ल्स हायस्कूल
संस्थेचे प्रशासन अधिकारी एस. जी. भोरे यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मी डॉ. ए. पी. जे. अब्दुलकलाम बोलतोय या विषयावर मरियम मुजावरने प्रभावी विचार मांडले. मुख्याध्यापिका सौ. ए. आर. सुळकुडे यांनी मनोगत व्यक्त केले. एस. व्ही. सोलगे यांनी आभार मानले.

* इंग्लिश मीडियम हायस्कूल
सौ. भारती कासार, सौ. स्नेहल जाधव यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पुस्तक प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. पाहुण्यांची ओळख व प्रास्ताविक अनिल आलमान यांनी केले. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात थांबून पुस्तकांचे वाचन केले. सौ. वर्षा दीक्षित यांनी केले. सौ. आसिफा मुल्ला यांनी आभार मानले.

* आंतरभारती विद्यालय
के. एम. कोळी यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. समर्थ वासुदेव या विद्यार्थ्याने डॉ. कलाम यांची व्यक्तीरेखा साकारली. पी. पी. सातपुते यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याची ओळख करून दिली. मुख्याध्यापक एम. डी. पाटील, पर्यवेक्षिका सौ. व्ही. सी. फाटक, एन. बी. कुंभार, आर. बी. परीट आदी उपस्थित होते.

* दि न्यू हायस्कूल
वृत्तपत्र विक्रेते वसंत कारंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांसाठी नियमित वृत्तपत्र व मासिके वाचण्याची गरज स्पष्ट केली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. ए. पाटील होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय ग्रंथपाल एम. आर. चोपडे यांनी करून दिला. डॉ. कलाम यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी वृत्तपत्राची विक्री शालेय परिसरात केली. एस. एम. शिंदे यांनी आभार मानले. सौ. लंबे यांनी सूत्रसंचालन केले.

* डीकेएएससी महाविद्यालय
ग्रंथालय विभाग व मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन झाला. ग्रंथपाल प्रा. विजय यादव यांनी समृद्धी ग्रंथालयातील ग्रंथसंपदा, नियतकालिके, विद्यार्थी केंद्रित उपक्रमांची माहिती दिली. दादासाहेब जगदाळे, मराठी अभ्यासक डॉ. ज्ञानेश्‍वर कांबळे यांनी महाविद्यालयाला ग्रंथ भेट दिले. ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन मांडले. याचे उद्‌घाटन प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य प्रा. डी. ए. यादव, प्रा. डॉ. व्ही. पी. पाटील, डॉ. डी. जी. घोडके, मेजर मोहन वीरकर आदी उपस्थित होते.

* कन्या महाविद्यालय
स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असेल तर पुस्तकांशी मैत्री करा, असे मत प्रा. प्रतिभा पैलवान यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. त्रिशला कदम होत्या. ग्रंथपाल मिनाज नायकवडी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. किरण कानडे यांनी मनोगत व्यक्त केले. सुधाकर इंडी यांनी आभार मानले. ग्रंथालय विभाग व समाजकार्य विभागाच्या वतीने हा कार्यक्रम झाला.

* इचलकरंजी हायस्कूल
डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन वृत्तपत्र विक्रेते राजू साने यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापिका सौ. व्ही. एच. उपाध्ये यांच्या हस्ते साने यांचा फेटा, ग्रंथ देऊन सन्मान केला. विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्राचे सामूहिक वाचन केले. पर्यवेक्षक यु. पी. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन स्काऊट विद्यार्थ्यांनी केले.

* रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन
विद्यालयाच्या वतीने पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान केला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. अभ्यास करत वृत्तपत्र वाटणाऱ्या शाळेचा विद्यार्थी केदार रावळ यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले. डॉ. कलाम यांच्या वेशभूषेत श्रुती होगाडे ही विद्यार्थीनी आली होती. विद्यार्थ्यांनी स्वरचित काव्यवाचन तसेच पुस्तक परीक्षण सादर केले. अध्यक्षस्थानी शाळेच्या अध्यापिका कवयित्री सरोजिनी खंडागळे होत्या. यावेळी मुख्याध्यापक विद्याधर भाट, अलका शेलार, राजेंद्र घोडके, नामदेव गाणबावले आदी उपस्थित होते.

* माजी विद्यार्थ्यांकडून पुस्तके भेट
डीकेएएससी महाविद्यालयातील भूगोल शास्त्र विभागाच्या माजी विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाविद्यालयाला पुस्तके भेट दिली. त्यांनी स्वयंस्फूर्तीने हा ग्रंथ दानाचा उपक्रम राबविला. प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्याकडे त्यांनी पुस्तके दिली. यावेळी डॉ. डी. सी. पाटील, डॉ. विनायक गाणबावले, डॉ. आतिष पाटील, प्रा. सचिन जाधव, डॉ. नवनाथ नाईकनवरे उपस्थित होते.

* व्यंकटेश महाविद्यालय
प्राचार्य डॉ. व्ही. ए. माने यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रा. डॉ. जरंडीकर, कार्यालय अधीक्षक अनोष गायकवाड यांनी ग्रंथालयास ग्रंथ भेट दिली. ग्रंथालयाने विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करत एक तास वाचनाचा हा स्तुत्य उपक्रम राबविला. डॉ. जरंडीकर यांनी कवितांचे सादरीकरण केले. प्रास्ताविक ग्रंथपाल एम. पी. केसरकर यांनी केले. शारीरिक शिक्षण संचालक प्रा. आमीन बाणदार यांनी आभार मानले.

* पंचशील हायस्कूल, शहापूर
विद्यालयात अनोख्या प्रकारे वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन झाला. वृत्तपत्र विक्रेते विजय वाईंगडे यांचा सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी वृत्तपत्राचे वाचन केले. मुख्याध्यापक एच. बी. धनवडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सौ. एन. एम. निर्मळ, एस. डी. शितोळे, टी. बी. वसावे, सौ. व्ही. एन. सोनार आदी उपस्थित होते.

* माधव विद्यामंदिर
सेवाभारती संचालित माधव विद्यामंदिरमधील शिक्षक, विद्यार्थ्यांनी इचलकरंजी व परिसरातील वृत्तपत्र विक्रेते यांची पहाटे भेट घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. वृत्तपत्र विक्रेता जीवन कोळी यांनी गेल्या ३० वर्षांपासून हा व्यवसाय करत आहे, मात्र माधव विद्यामंदिरने केलेला हा आमचा पहिलाच सत्कार आहे. आम्ही पेपर वाटप करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करत असतो. शाळेच्या या सत्कारामुळे आमचा उत्साह अधिकच वाढला असल्याचे सांगितले. विष्णू पाटील, शिवानंद रावळ, सतीश कांबळे, सुरेश चौगुले, सागर चिखलकर आदी उपस्थित होते.

---------

कुंभोज परिसर
कुंभोज ः येथील ग्रामपंचायत, केंद्र शाळा, उर्दू शाळा, कन्या शाळा, न्यू इंग्लिश स्कूल, गर्ल्स हायस्कूल व रयत पब्लिक स्कूलमध्ये विविध उपक्रमांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी केली. ग्रामपंचायतीत उपसरपंच अनिकेत चौगुले यांनी प्रतिमापूजन केले. बाहुबली येथील एम. जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन, वृत्तपत्र विक्रेता दिन व हात धुवा दिन उत्साहात झाला. मुख्याध्यापक गोमटेश बेडगे अध्यक्षस्थानी होते. प्रणव विभूते या विद्यार्थ्याने डॉ. कलाम यांच्या वेशभूषेमध्ये मनोगत व्यक्त केले. ‘सकाळ’ वृत्तपत्राचे वाचन सोहम पाटील यांनी केले. वृत्तपत्र विक्रेते महाबली बड्डे यांचा सन्मान केला. कर्मवीर फाउंडेशनतर्फे सुशांत पाटील व सचिन नामे यांनी विद्यालयास सॅनिटायझरचे वाटप केले. नरंदे येथील ब्रिलियंट सैनिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगण्यात आले. ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’निमित्त विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम यांच्या वेशभूषेतून वृत्तपत्र वितरण केले. गावातून फेरी काढून ग्रामस्थांना हात धुण्याचे महत्त्व पटवून दिले. मुख्याध्यापक एस. एन. पाटील यांनी हात धुण्याची कृती करून घेतली. संस्थापक नितीन पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुर्गेवाडी येथील विद्यामंदिरात शालेय समितीचे अध्यक्ष राहुल घोलप यांनी प्रतिमापूजन केले. बाळासाहेब कोळी अध्यक्षस्थानी होते. राजकुमार भोसले, शोभा कोळी यांनी मनोगत व्यक्त केले.
-------------------
कबनूर परिसर
कबनूर ः परिसरात वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले. कबनूर हायस्कूल येथे वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन संयुक्तपणे साजरा केला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी. डी. चौगुले होते. वृत्तपत्र विक्रेते सुरेश चौगुले यांच्या हस्ते डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. श्रीवर्धन कुलकर्णी या विद्यार्थ्याने डॉ. कलाम यांची वेशभूषा साकारली होती. पुत्रदा निंबाळकर, सुरेश चौगुले, पर्यवेक्षक एस. जी. उगारे यांनी मनोगत व्यक्त केले. वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त वृत्तपत्र विक्रेते सुरेश चौगुले यांचा सत्कार केला. जवाहरनगर हायस्कूलमध्ये झालेल्या वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. विद्यालयाचा विद्यार्थी शिवानंद तुकाराम तावरे हा वृत्तपत्र विक्रेता आहे. त्याचा तसेच वृत्तपत्र विक्रेते सुरेश चौगुले यांचा सत्कार केला. प्रमुख वक्ते ए. एन. माने यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान दिले. मणेरे हायस्कूल
डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर व मणेरे हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन केले. संस्थापक सुधाकरराव मणेरे यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष केटकाळे, मार्गदर्शक संजय देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्या ऊर्मिला माने, उपमुख्याध्यापिका संगीता व्हनबट्टे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका तस्लिम मणेर, उपमुख्याध्यापिका पुष्पा ऐनापुरे आदी उपस्थित होत्या.
---------
रुकडी परिसर
रुकडी ः काकासाहेब माने हायस्कूल व जवाहर सार्वजनिक वाचनालय यांचे संयुक्त विद्यमाने विद्याशाखेत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा केला. डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सौ. पद्मजा पाटील यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून जवाहर वाचनालयाचे अध्यक्ष महावीर खोत होते. यावेळी मुलांनी बालसाहित्याचे वाचन केले. रुहान पेंढारी याने स्वरचित कविता सादर केली. श्रेणिक खाडे याने वाचनाचे महत्त्व सांगितले. फरहान पेंढारी याने मी मलाला या पुस्तकाचा परिचय करून दिला. सौ. श्रुती सुतार यांनी संस्कारक्षम आई लेखाचे वाचन केले. श्रीमती सुकेशनी मगदूम यांनी चला वाचन संस्कार करूया, या शिक्षण संक्रमणमधील लेखाचे वाचन केले.
------------
डांगे महाविद्यालय
कबनूर ः हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त मराठी विभाग, सांस्कृतिक विभाग व ग्रंथालय विभागातर्फे कार्यक्रम झाला. प्रमुख उपस्थित म्हणून पर्यवेक्षक प्रा. शंकरराव मोहिते, प्रा. बालाजी कांबळे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. योजना जुगळे होत्या. मान्यवरांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रा. शंकरराव मोहिते, प्रा. बालाजी कांबळे, प्रा. मनीष साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. काव्यवाचन स्पर्धेतील विजेते विद्यार्थी अनुक्रमे आकाश कुंभार, आरती कांबळे, साक्षी कांबळे, पायल मोरे यांना प्रा. रवींद्र पाटील यांच्याकडून ग्रंथभेट दिले. प्रा. डॉ. अमर कांबळे, प्राचार्या डॉ. योजना जुगळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. रवींद्र पडवळे यांनी स्वागत केले. प्रा. रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुनीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. साक्षी चौगुले यांनी आभार मानले.