वृत्तपत्र विक्रेता दिन गडहिंग्लजला उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृत्तपत्र विक्रेता दिन गडहिंग्लजला उत्साहात
वृत्तपत्र विक्रेता दिन गडहिंग्लजला उत्साहात

वृत्तपत्र विक्रेता दिन गडहिंग्लजला उत्साहात

sakal_logo
By

56718
--------------------------
वृत्तपत्र विक्रेता दिन
गडहिंग्लजला उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १६ : येथील गडहिंग्लज वृत्तपत्र विक्रेता संघटनेकडून माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन अर्थात वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष महादेव आडसुळे यांनी पुष्पहार अर्पण करुन प्रतिमा पुजन केले.
श्री. आडसुळे म्हणाले, ‘सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. प्रत्येक बातमी मोबाईलवर येत आहे. त्यामुळे वृत्तपत्र वाचकाकडे पूर्वीच्या तुलनेत कल कमी झाला आहे. वाचकांची संख्या वाढावी यासाठी प्रबोधन केले जाणार आहे.’ संघटनेचे उपाध्यक्ष नामदेव लुगडे, खजिनदार सुरेश खोत, आनंद गुरव, काशिनाथ गडकरी, सुशांत आडसुळे, विजय देवन्नावर, अजित स्वामी, आण्णासाहेब नेवडे, महादेव गायकवाड, बंडा केसरकर आदी उपस्थित होते.