कोजिमाशि ही शिक्षकांची मातृसंस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोजिमाशि ही शिक्षकांची मातृसंस्था
कोजिमाशि ही शिक्षकांची मातृसंस्था

कोजिमाशि ही शिक्षकांची मातृसंस्था

sakal_logo
By

56722
------------------------------------------------------
‘कोजिमाशि’ ही शिक्षकांची मातृसंस्था
आमदार पाटील : गडहिंग्लज शाखेत चिरंतन व्याज वितरण
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १६ : ‘‘कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्था ही खऱ्‍या अर्थाने शिक्षकांची आदर्श मातृसंस्था आहे,’’ असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी केले.
संस्थेच्या गडहिंग्लज शाखेतर्फे दिवाळी भेट व चिरंतन व्याज वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. तज्ज्ञ संचालक दादा लाड अध्यक्षस्थानी होते.
श्री. लाड म्हणाले, ‘‘सर्वांना विश्‍वासात घेऊन कारभार सुरू असल्याने संस्था प्रगतिपथावर आहे. स्थापनेपासून दिवाळीसाठी सभासदांना भेटवस्तू देणारी ही कुटुंबसंस्था आहे. संस्थेतर्फे सभासदांसाठी विविध सुविधा दिल्या जातात.’’
संचालक व गडहिंग्लज शाखाध्यक्ष सचिन शिंदे, विनोद नाईकवाडे यांची भाषणे झाली. आमदार पाटील, श्री. लाड, श्री. शिंदे, निकम यांच्याहस्ते भेटवस्तू व चिरंतन व्याज वितरण झाले. विविध पुरस्कारप्राप्त सभासद शिक्षकांचा सत्कार झाला. माध्यमिक पतसंस्थेचे अध्यक्ष सतीश रेडेकर, जयसिंग चव्हाण, संजय भांदुगरे, गंगाराम शिंदे, अरविंद बारदेस्कर, दत्तात्रय परीट, डी. एस. दिवटे, डी. व्ही. चव्हाण, पंडित पाटील, शरद पाटील, विनायक नाईक, संजय देसाई, बाळासाहेब परितकर, बजरंग गरुड, जयवंत दरेकर, किरण आमणगी, संतोष देसाई, शाखाधिकारी रणजित पाटील आदी उपस्थित होते. रफिक पटेल यांनी प्रास्ताविक केले. वैजनाथ पालेकर यांनी सूत्रसंचालन केले. संपत सावंत यांनी आभार मानले.