शिक्षकाचे उपोषण मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकाचे उपोषण मागे
शिक्षकाचे उपोषण मागे

शिक्षकाचे उपोषण मागे

sakal_logo
By

शिक्षकाचे
उपोषण मागे
चंदगड ः कडलगे खुर्द (ता. चंदगड) येथील एल. पी. पाटील या शिक्षकाने गावातील मूलभूत प्रश्नाच्या सोडवणुकीकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या (ता. १७) उपोषणाचा इशारा दिला होता; परंतु त्यांच्या मागण्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीने सकारात्मकता दर्शवल्यामुळे उपोषण मागे घेतले. गावातील स्मशानशेड आणि नदीघाटावर महिलांसाठी बंदीस्त स्नानगृह या मागण्यांसाठी काही वर्षांपासून ग्रामसभेत मागणी करून शासन दरबारी पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, या दोन्ही मागण्यांसाठी ग्रामपंचायतही आग्रही आहे. त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे, अशी लेखी विनंती ग्रामपंचायतीने केल्यानंतर पाटील यांनी त्याला प्रतिसाद देत हे उपोषण मागे घेतले आहे.