वर्ल्ड स्पाईन डे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्ल्ड स्पाईन डे
वर्ल्ड स्पाईन डे

वर्ल्ड स्पाईन डे

sakal_logo
By

वेळीच लक्ष दिल्यास मोडणार नाही कणा...
बदलत्या जीवनशैलीमुळे मणक्याचे आजार बनली गंभीर समस्या

कोल्हापूर, ता. १८ : मोडेन पण वाकणार नाही अशी मराठीतील म्हण. याचाच अर्थ असा की, हा कणा नेहमी आपल्याला व आपल्या स्वाभिमानाला बळकटी देतो; मात्र सध्याचा वर्क फ्रॉम होमचा ट्रेंड, मोबाईलचा अति वापर तसेच दिनचर्येतील अनेक चुकीच्या सवयी यामुळे हा कणा आता दुबळा होऊ लागला आहे. मणक्याचे आजार ही बदलत्या जीवनशैलीमुळे गंभीर समस्या बनली आहे. अनेकदा चुकीच्या पद्धतीने दीर्घकाळ बसल्यामुळे पाठीच्या मणक्याला इजा पोहचू शकते अथवा मणक्यात गॅप पडू शकतो. प्रत्येक वयोगट यातून सुटलेला नाही.
  
पाठीची रचना
पाठीच्या कण्यामध्ये मानेच्या भागात ७, पाठीच्या भागात १२, तर कंबरेचे ५ मणके असतात. हे ५ मणके माणसाचे वजन पेलण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. त्यानंतर असते माकड हाड. दोन मणक्यांमध्ये गादीसारखा मऊ भाग (डिस्क) असतो. हा मणक्याला लवचिकपणा देतो.

कंबर दुखीची कारणे
१) संधिवात
२) बसण्याची व उभे राहण्याची चुकीची पद्धत
३) चकतीची झीज होणे
४) मणक्यामधील स्नायूंचा अतिरिक्त वापर अथवा इजा
५) गर्भारपणात वजन वाढणे
६) पाठीच्या कण्यातील दोष
७) श्रमाची कामे
८) खेळातील यांत्रिक ताणामुळे येणारा जैवयांत्रिकी ताण
९) लठ्ठपणा
१०) वाढलेले वजन विशेषतः कंबरेभोवतीचा घेर

कंबरदुखीची लक्षणे
१) पाठीमध्ये असह्य वेदना
२) पाठीच्या खालच्या भागापासून पायापर्यंत अथवा गुडघ्यापर्यंत वेदना पसरणे
३) सायटिका
४) बधिरपणा किंवा मुंग्या येणे
५) अचानक शौचास किंवा लघवी होणे
६) पोटात वेदना
७) हात किंवा पायातील ताकद जाणे
८) श्वास घेण्यास त्रास होणे
९) चक्कर येणे
१०) तोल जाणे

तपासणी 
तपासणी हा अचूक निदानाचा मुख्य उद्देश असतो. यासाठी एक्स रे, बोन स्कॅन, एमआरआय, एनसीव्ही तसेच रक्ताची तपासणी आवश्यकतेनुसार.

प्राथमिक उपचार
*व्यायाम-
पाठीचे व मानेचे स्नायू बळकट करण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्यायाम करणे
*आग होत असल्यास-
बर्फाने शेकणे. यामुळे स्नायूंवरील ताण कमी होण्यास मदत 

*सपाट किंवा कमी टाच असलेले चप्पल वापरणे, धूम्रपान सोडणे

शस्त्रक्रिया
मणक्यातील कोणत्या भागात बाधा आहे त्यानुसार शस्त्रक्रिया केल्या जातात. अनेक आधुनिक उपचार पद्धतीमुळे हे सध्या सुकर बनले आहे. गरजेनुसार उपचार घेऊन पुन्हा ठणठणीत बरे होता येते. अधिक काळ हे दुखणे अंगावर काढल्याने अथवा दुर्लक्ष केल्याने व्यंगत्व येऊ शकते. सध्या आधुनिक उपचार पद्धतीत नर्व्ह ब्लॉक, बिनटाक्याची मणक्याची शस्त्रक्रिया, इंडोस्कोपिक सर्जरी, मायक्रो लूंबर डिस्कक्टोमी, लहान मुलांतील जन्मजात दोष, बाक, वेडेवाकडेपणा, शस्त्रक्रियेने उपचार करणे, स्पाईन फिक्सेशन व इम्प्लांट, व्हर्टिब्रे प्लास्टी, मणक्यातील चकती बदलणे, मणक्यातील गाठी अथवा कॅन्सर दूर करणे, स्टेमसेल थेरपी आदी उपचार पद्धती आहेत.

कोट 
मणक्याच्या आजारात मसाज अथवा तुडवून घेऊन आराम मिळत नाही. मणक्यास लेप लावणे, काठ्या बांधणे चुकीचे आहे. मणक्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतरही पूर्ववत काम करता येते. नवीन तंत्रज्ञान व योग्य पद्धतीने वेळेत योग्य उपचार झाल्यास रुग्णास पूर्ववत कार्यक्षमता मिळते. आधुनिक उपचार सुरक्षित वेदनामुक्त आहेत.
-डॉ. कौस्तुभ वाईकर, मणका व मेंदूविकार तज्ज्ञ.