लाईन बाजार निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाईन बाजार निकाल
लाईन बाजार निकाल

लाईन बाजार निकाल

sakal_logo
By

लाईन बझार सोसायटीत
सत्ताधाऱ्यांची बाजी

कसबा बावडा, ता. १६ ः येथील लाईन बझार को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक लागलेल्या सर्वच्या सर्व दहा जागा जिंकत सत्तारूढ गटाने बाजी मारली. निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडाला. निकालानंतर विजयी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
आजच सकाळी आठ ते सायंकाळी चार यावेळेत मतदान झाले. एकूण १२०० मतदारांपैकी ८४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. संचालक पदाच्या एकूण १३ जागांसाठी निवडणूक झाली होती. यापैकी अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय व भटक्या विमुक्त गटातील एक अशा तीन जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित दहा जागांसाठी ही निवडणूक झाली. त्यात संदीप शिंदे, बळीराम यादव व दिलीप हेगडे या नव्या चेहऱ्यांना सत्तारूढ गटातून संधी मिळाली. श्री. हेगडे हे बिनविरोध विजयी झाले आहेत. या निवडणुकीत विरोधी पॅनेलने चांगली ताकद लावली होती, पण मतदारांनी सत्तारूढ गटावरच पुन्हा एकदा विश्‍वास दाखवला.

चौकट
विजयी उमेदवार व मिळालेली मते
रवींद्र जयवंतराव भोसले- ५६६, राहुल विलास गावडे- ५१४, अतुल परब - ४८७, लक्ष्मण गायकवाड - ४८१, विनायक सावंत- ४७४, संदीप शिंदे- ४६५, शिवराज सावंत- ४४८, बळीराम यादव- ४२८, महिला प्रतिनिधी - संजीवनी पाटील- ५९९, नजराना शेख - ४७०