एकाच वर्षातील कर्जामध्ये कमी रक्कमच पात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकाच वर्षातील कर्जामध्ये कमी रक्कमच पात्र
एकाच वर्षातील कर्जामध्ये कमी रक्कमच पात्र

एकाच वर्षातील कर्जामध्ये कमी रक्कमच पात्र

sakal_logo
By

एकाच वर्षातील कर्जामध्ये
कमी रक्कमच पात्र

प्रोत्साहनपर अनुदान : मृत वारसांबद्दल सूचना हवी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक रक्कम वाटप केली जाणार आहे. आपले सरकार किंवा महा-ई-सेवा केंद्रात आधारकार्ड प्रमाणिकरण झाल्यानंतर गुरुवारी (ता. २०) ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. दरम्यान, योजना जाहीर झाल्यानंतर मृत झालेल्या; पण यादीत नाव आलेल्या वारसांच्या नावावर रक्कम कशी जमा करावी. तसेच, एकाच वर्षात दोन वेगवेगळ्या तारखेला काढलेले कर्ज आणि वेळेत परतफेड केलेल्या कर्जाची कमी असणारी रक्कमच यादी पात्र धरण्यात आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

जिल्ह्यातील ९० टक्के शेतकरी आपले कर्ज वेळेत परतफेड करतात. त्यामुळे त्यांना कर्जमाफीचा लाभ कमी झाला; पण प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देताना शेतकऱ्यांची काहीअंशी अडवणूक झाल्याचे चित्र आहे. एखाद्या शेतकऱ्याने एकाच वर्षात आपले मंजूर कर्ज दोन वेगवेगळ्या तारखेला काढले असेल तर त्यापैकी या दोन्ही रक्कम पात्र ठरत असताना केवळ कमी असणारी रक्कम गृहीत धरून यादीत दिली आहे. तसेच, प्रोत्साहनच्या याद्या तयार झाल्यानंतर काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, त्या शेतकऱ्यांची नावे यादीत प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे ही रक्कम वारसांना मिळणे क्रमप्राप्त आहे.
प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या यादीतील काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्या मृत शेतकऱ्यांच्या वारसांना लाभ कसा द्यावा याबद्दल सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे ही रक्कम वाटप करताना अडचण येणार आहे.
- सुनील पोवार, लिपिक
नरसिंह सहकार समूह, पाडळी खुर्द
...